पोलिस प्रशासन निवडणुकांसाठी सज्ज : पोलिस अधीक्षक उगले 

पोलिस प्रशासन निवडणुकांसाठी सज्ज : पोलिस अधीक्षक उगले 

जळगाव : लोकसभा निवडणुकांसाठी सोमवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलिस दलही निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. अधिकारी, कर्मचारी यांसह मनुष्यबळांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिली. 
निवडणुकीचा जिल्हास्तरीय कार्यक्रमानुसार आवश्‍यक बुथ केंद्र तसेच संवेदनशील परिसराचा अभ्यास करून जिल्हाभरात योग्य असा सक्षम पोलिसांचा बंदोबस्त दिला जाणार आहे. नागरिकांसह उमेदवारांनी पोलिस दलाला निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असेही डॉ. उगले यांनी सांगितले. जिल्ह्यातील अनेक राजकीय, सामाजिक, औद्योगिक, व्यापारी, वैद्यकीय अशा विविध मंडळींकडे स्वसंरक्षणार्थ परवानाधारक पिस्तूल व रिव्हॉल्वर असतात. आचारसंहिता लागल्यामुळे हे पिस्तूल, रिव्हॉल्वर जमा करावे लागतात. सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकांमध्ये तशा सूचना दिल्या आहेत. यासाठी जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या शस्त्र परवाना समितीनुसार कामकाज चालते. जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश आल्यानंतर परवानाधारक व्यक्तींची शस्त्र जमा करण्यात येईल. त्याबाबत त्यांना नोटिसा देखील लवकरच पाठविण्यात येईल, अशी माहिती देखील पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com