राष्ट्रीय शहीद दिनाला मतदान 

राष्ट्रीय शहीद दिनाला मतदान 

सोशल मीडियावर व्यक्त केला पोलिसांनी रोष 

जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता शनिवारी जाहीर झाली. मुख्य निवडणूक आयोगाने मतदानासाठी 21 ऑक्‍टोबर ही तारीख जाहीर केली असून, पोलिस दलासह देशातील सर्वच संरक्षण दलातर्फे या दिवशी "शहीद' दिन पाळला जातो. परिणामी, मतदानाच्या तारखेवरुन पोलिसदलात चर्चेचे गुऱ्हाळ रंगले असून, पोलिसांतर्फे व्हॉटस्‌ऍप, फेसबुक या सोशल मीडियाद्वारे तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहे. 
महराष्ट्रात 288 तर हरियानात 90 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार अर्ज भरण्याची मुदत 4 ऑक्‍टोबर, मागे घेण्यासाठी 7 ऑक्‍टोबर, अर्ज छाननी 5 ऑक्‍टोबर, मतदान 21 ऑक्‍टोबर आणि निकालासाठी 24 ऑक्‍टोबर अशा तारखा श्री. अरोरा यांनी जाहीर केल्या आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या बरोबर आचारसंहिता लागू झाली आणि पोलिसदल आपल्या तयारीला जुंपले आहे. निवडणुकांचा संपूर्ण ताण पोलिसदल, राज्य राखीव पोलिस बल, केंद्रीय राखीव बलांवर अवलंबून असते. परिणामी, मतदानाच्या तारखेवरुन व्हॉट्‌सऍप, फेसबुक ग्रुपवर प्रतिक्रियांचा पाऊस पडण्यास सुरवात झाला आहे. 

शहीद दिनाचा विसर.. 
सीमा सुरक्षा बलासह तिन्ही सेना, राज्य राखीव, पोलिस दल इतकच नाही तर, गृहरक्षक अशा देशभरात कार्यरत सुरक्षा यंत्रणांतर्फे 21 ऑक्‍टोबर हा राष्ट्रीय हुतात्मादिन (शहीद दिन) म्हणून पाळला जातो. विधानसभा निवडणुकांच्या मतदानाचा दिवसही 21 ऑक्‍टोबर असल्याने नेटिझन्स्‌ने या दिवसाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. 

पोलिस दलाच्याही प्रतिक्रिया 
"व्हॉटस्‌ऍप', "फेसबुक'द्वारे पोलिसदलात कार्यरत असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांतर्फे शहीद दिनालाच मतदान असल्याने, निवडणुकांचा बंदोबस्त करायचा की, शहीद बांधवांना मानवंदना द्यायची... सरकारला विसर पडलाय का? अशा विविध प्रतिक्रिया उमटण्यास सुरवात झाली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com