छेडखानीची तक्रारी मग उचला फोन अन्‌ करा कॉल...

छेडखानीची तक्रारी मग उचला फोन अन्‌ करा कॉल...

जळगाव : शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनींसह तरुणी व महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस दलाची हेल्पलाइन यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. पोलिस नियंत्रण कक्षातील टोल फ्री नंबरसहीत आता व्हाट्‌सऍप आणि मोबाईल नंबरद्वारे तत्काळ मदत पोचवण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी जाहीर केले आहे. 

जिल्हा पोलिसदलाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रानुसार, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थिनी, नोकरदार तरुणी, महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस दलात निर्भया, दामिनी पथके कार्यान्वित आहेत. सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सार्वजनिक ठिकाणे, शैक्षणिक संस्था आणि बाजारात ही पथके गस्तीवर असतात. आता महिला सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसदलातील यंत्रणा अधिक सतर्क करण्यात येत असून पोलिसदलाच्या वतीने हेल्पलाइन सुविधेत मोबाईल नंबर, व्हॉट्‌सऍप आणि टोल फ्री नंबरचा समावेश करण्यात आला आहे. येणाऱ्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्याच्या सूचना नियंत्रणकक्षासह जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी खास करून महिला तरुणींनी या हेल्पलाइनचा लाभ घ्यावा असे आवाहन पोलिस दलातर्फे करण्यात आले आहे. 

पोलिस काका, पोलिस दीदी योजना 
शाळा महाविद्यालयात घडणाऱ्या विविध गुन्हेगारी घटना (रॅगिंग, अमलीपदार्थ सेवन, सायबर गुन्हे, मुलींची छेडखानीचे प्रकार) आदींवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस आणि विद्यार्थ्यांचे नाते तयार होऊन त्यातून या तक्रारींचा निपटारा करण्याकरिता पोलिस दादा व पोलिस दीदी संकल्पना राबवली जात आहे. महिला पोलिस आणि पुरुष कर्मचारी या योजने अंतर्गत महाविद्यालयातील हालचालींवर लक्ष ठेवून विद्यार्थ्यांचा संपर्क वाढवत आहेत. 

बडी कॉप-buddy cop संकल्पना 
महिला संबंधी प्रकरणांमध्ये सुरक्षिततेसाठी ही संकल्पना राबवली जात असून त्यात विविध खासगी, सरकारी कंपन्या आणि संस्थेत कार्यरत महिला तरुणींना सुरक्षा प्रदान करण्यासोबतच तक्रारींवर तत्काळ कारवाईसाठी पोलिस ठाणे स्तरावर ही संकल्पना राबविण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. 

जागरूक नागरिक अभियान 
गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने नागरिकांना जागृक करून त्यांच्या मध्ये सुरक्षिततेची भावना वृद्धिंगत करण्यात येऊन स्वतःची मालमत्ता कुटूंबाबाबत सतर्क करण्यासाठी जागरूक नागरिक अभियान राबवले जात आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com