शिक्षकांना वगळून पोषण आहारासाठी स्वतंत्र यंत्रणा : गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

जळगाव ः पटसंख्या ही शाळांची आत्मा असून, शैक्षणिक गुणवत्ता ही संपूर्ण शिक्षण प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक आहे. पटसंख्या व गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची आर्थिक स्थितीपेक्षा मनःस्थिती उत्तम असण्याची गरज आहे. म्हणूनच शालेय पोषण आहाराचे काम शिक्षकांकडून काढून घेणे आज काळाची गरज असून त्यासाठी स्वतंत्र ठेवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ए. टी. झांबरे विद्यालयात विज्ञान प्रदर्शन उद्‌घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती यमुना रोटे होत्या. 

मंत्री पाटील म्हणाले, की ढकलगाडी- पटसंख्यावाढ या धोरणाला अधिकाऱ्यांनी आळा घालून पालकांनी इंग्रजी माध्यमाचा अट्टाहास न धरता मातृभाषेतील शिक्षणावर भर द्यावा, विद्यार्थ्यांनी विज्ञानाबाबत जिज्ञासावृत्ती जागृत ठेवावी. 

शिक्षकांचा गौरव 
यावेळी तालुक्‍यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना गौरविण्यात आले. यात गणेश बागूल (मोहाडी), राजेंद्र पाटील (बोरनार), खुदेजा मॅडम (नशिराबाद), महेंद्र नेमाडे (जळगाव), प्रवीण चौधरी (सावखेडा खुर्द) व मिलिंद कोल्हे (रायपूर) या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, रवी देशमुख, उपसभापती शीतल पाटील, पंचायत समिती सदस्या ज्योती पाटील, जागृती चौधरी, जनाअप्पा पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत सोनवणे, उपशिक्षणाधिकारी डॉ. डी. एम. देवांग, विस्तार अधिकारी आर. व्ही. बिऱ्हाडे, के. एन. वायकोळे, बी. डी. धाडी, ए. एफ. पठाण, प्रतिभा चव्हाण, के. एम. शेख, मुकेश सोनवणे, जिल्हा शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष ईश्‍वर सपकाळे, नरेंद्र सपकाळे, राजेश जाधव, राधेश्‍याम पाटील, वासुदेव चौधरी, नाना पाटील, तसेच सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व विविध गावांचे सरपंच, शालेय समित्यांचे अध्यक्ष, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या सुरवातीला ए. टी. झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. उपशिक्षिका प्रणिती झांबरे यांनी सूत्रसंचालन केले. तालुक्‍यातील शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शेती, वीज व पाणी तसेच विविध आधुनिक उपकरणे तयार केली होती.

Web Title: marathi news jalgaon poshan aahar teacher minister patil