प्रभाग समिती सभापतींची 22 ला होणार निवड 

प्रभाग समिती सभापतींची 22 ला होणार निवड 

जळगाव ः महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यानंतर प्रभाग समितीच्या सभापती निवड प्रक्रिया होणार आहे. यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रभाग समित्यांचे सभापती निवडीसाठी 22 फेब्रुवारीला विशेष सभा घ्यावी, असे पत्र आज महापालिकेला मिळाले आहे. 
मनपाच्या अधिनियमात प्रभाग समित्या स्थापन करण्याची तरतूद आहे. मनपाची ऑगस्टमध्ये निवडणूक होऊन सहा महिने होऊन देखील प्रभाग समित्या स्थापन झाल्या नव्हत्या. यासाठी प्रभाग सभापतींसाठीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे मनपाने दिला होता. त्यानुसार विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रभाग समिती सभापतिपदासाठी निवड प्रक्रियेचा कार्यक्रम आज जाहीर केला. त्यानुसार 22 फेब्रुवारीला सकाळी अकराला महापालिकेच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली सभा होणार आहे. 

प्रभाग समित्यांवर भाजपचेच सभापती 
महापालिकेत भाजपाचे 57, शिवसेनेचे 15 व एमआयएमचे 3 नगरसेवक आहेत. नव्याने रचना करण्यात आलेल्या प्रभाग समितीच्या चारही प्रभाग समित्यांमध्ये भाजपचेच बहुमत आहे. त्यामुळे चारही समित्यांवर भाजपचे सभापती बसणार आहेत. 

ऍक्‍टिव्ह नगरसेवकाला संधी 
नागरिकांसाठी काम करणारे तसेच ऍक्‍टिव्ह नगरसेवकांना संधी दिली जाणार असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली. तसेच प्रभाग समितीच्या कार्यकारिणीत काही कार्यकर्त्यांना देखील संधी दिली जाणार असल्याची माहिती आमदार भोळे यांनी दिली. 

अशी आहे प्रभाग समितीची रचना 
प्रभाग 1 : प्रभाग 1,2,5,7,8 
प्रभाग 2 : प्रभाग 3,4,15,16,17 
प्रभाग 3 : प्रभाग 6,13,14,18,19 
प्रभाग 4 : प्रभाग 9,10,11,12 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com