अपक्षां'च्या प्रचारात "अर्ची-परशा' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

जळगाव ः "सैराट' चित्रपटातील आरची-परशा या जोडीला साऱ्यांनीच डोक्‍यावर घेतले. या चित्रपटातील प्रत्येक सिन आणि डायलॉग, गाणे युवा वर्गाच्या मुखात होते. पण आता "अर्ची-परशा' ही जोडी जळगाव महापालिका निवडणुकीच्या रणांगणात "अपक्ष' उमेदवारांच्या प्रचारात आली आहे. यासाठीही सोशल मीडियाचा आधार उमेदवारांकडून घेतला जात आहे. 

निवडणूककाळात प्रचारासाठी वेगवेगळ्या शक्‍कल लढविल्या जात आहेत. यामध्ये उमेदवार स्वतः व्हिडिओ तयार करून व्हायरल करत आहे. पण आता चित्रपटातील डायलॉग घेऊन त्याला प्रचाराच्या वाक्‍यांमध्ये डबिंग करून मतदारांपर्यंत "व्हॉटस्‌ऍप'च्या माध्यमातून पोहोचविले जात आहे. जळगाव महापालिका निवडणुकीत हे चित्र आता पाहावयास मिळत आहे. यात "अपक्ष' उमेदवारांनी ही अनोखी शक्‍कल लढवत "सैराट'मधील टीमलाच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारात आणले आहे. 

...थेट मतदानाला चालले 
महापालिका निवडणुकींतर्गत मतदानाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे त्यानुसार प्रचारात जोर चढला आहे. प्रत्यक्ष गाठीभेटींसोबत प्रचारात एक वेगळा रंग आणला जात आहे. निवडणुकीत उतरलेल्या एका "अपक्ष' उमेदवाराकडून "सैराट'मधील तीन-चार संवाद एकत्रित आणि त्यांचे डबिंग केलेला व्हिडिओ "व्हॉटस्‌ऍप'वरून व्हायरल केला जात आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये ट्रॅक्‍टर चालवत आलेल्या आरचीचा संवाद "येऊ का आत्या...आता येथून थेट शेतात चाललेय' याचे डबिंग करून "येऊ का आत्या...आता येथून थेट चाललेय मतदानाला' असा करण्यात आला आहे. म्हणजेच मतदानाचे आवाहनही यातून करण्यात आले आहे. 

परिवर्तन म्हणजे विकासाला मत 
राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढविणारे असो किंवा "अपक्ष' म्हणून निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांकडून आकर्षक प्रलोभन दिले जात आहे. पण सर्वच उमेदवारांचे एक वाक्‍य सारखेच आहे. "आपले मत म्हणजे विकासाला मत' हे वाक्‍य घेऊन मतदारांना आवाहन केले जात आहे. 

Web Title: marathi news jalgaon prachar aarchi- parshya