पंतप्रधान आवास योजनेत 6900 घरकुलांचे काम बाकी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

जळगाव ः केंद्र व राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत राज्यात ग्रामीण भागात घरकुलाचा लाभ घेणाऱ्यांमध्ये जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे. परंतु अद्याप जिल्ह्यातील 6 हजार 894 घरकुलांचे बांधकाम बाकी आहे. हे उद्दीष्ट नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनावर आहे. 

जळगाव ः केंद्र व राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत राज्यात ग्रामीण भागात घरकुलाचा लाभ घेणाऱ्यांमध्ये जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे. परंतु अद्याप जिल्ह्यातील 6 हजार 894 घरकुलांचे बांधकाम बाकी आहे. हे उद्दीष्ट नोव्हेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनावर आहे. 
केंद्र शासनाने अल्प उत्पन्न असलेल्यांसाठी पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुल मंजूर करण्यात येत असते. घरकुल बांधण्यासाठी लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख 20 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात येत असते. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत 2016-17 व 2017-18 या वर्षात जिल्ह्यात 20 हजार 921 घरकुल बांधकामाचे उद्दीष्ट आहे. यातील 16 हजार 27 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून अद्याप 6 हजार 894 घरकुलांचे काम बाकी आहे. या उद्दीष्ट पुर्तीमध्ये सहा हजार लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जवळपास सात हजाराच्या जवळपास घरकुलांचे काम बाकी असून, घरकुलांचे उद्दीष्ट पुर्तीत जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

तर गुन्हे दाखल 
घरकुल बांधकाम मंजुरी देण्यात आलेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून 1 लाख 20 हजार रुपयांचे अनुदान मिळत असते. यातील अनेकांनी घरकुलाचा पहिला हप्ता घेतला असून, घरकुलाचे बांधकाम करण्यास सुरवात देखील केलेली नाही. म्हणजेच ज्यांनी घरकुलांचा पहिला हप्ता घेऊन गायब झाले अशा विरुद्ध अफरातफर प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सीईओ शिवाजी दिवेकर यांनी सांगितले. 

56 हजार लाभार्थ्यांची नोंदणी 
ग्रामीणमध्ये शासनाने आता घरकुल लाभ देण्यासाठी नव्याने यंत्रणा उभारली असून, लाभार्थ्यांची नावे आवास प्लस ऍपमध्ये नोंदविली जाणार आहेत. यामध्ये सरपंच किंवा सदस्य यांचा कोणताही हस्तक्षेप असणार नाही. घरकुलाची मागणी करणाऱ्या कुटुंबांना आवास प्लस ऍपद्वारे सर्वेक्षणासाठी अर्ज भरावा लागणार आहे. यामध्ये जिल्ह्यातून 3 लाख 77 हजार लाभार्थ्यांचे अर्ज आले असून, यापैकी 56 हजार 202 लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे. 

Web Title: marathi news jalgaon pradhan mantri aavas yojna 6900 panding