माध्यमिक प्रमाणीकरण समितीचा चोवीस तास पहारा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 एप्रिल 2019

जळगाव ः राज्यात नव्हे देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. निवडणूक आयोग आदर्श आचार संहिता लागू करण्यासाठी कशोशीने पर्यंत करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मीडिया कक्ष होय. या कक्षाच्या माध्यमातून सोशल मीडियासह पेपर जाहिराती, ऑडिओ, व्हिडिओ जाहिरातीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. सतत चोवीस तास कक्षाचे सुमारे पंधरा कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. 

आदर्श आचार संहिता लागू करण्यासाठी अनेक समित्या गठित करण्यात आल्या आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाची समिती ती म्हणजे माध्यम प्रमाणीकरण संनियंत्रण समिती आहे. या समितीचे गठन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित झाली आहे. या समितीवर जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, त्यांचे सहकारी, एक जेष्ठ पत्रकार याचा समावेश आहे. 
या समितीच्या माध्यमातून सोशल मीडिया, फेसबुक, व्हॅट अँप्स, याच्यासह अन्य माध्यमावर त्या विभागातील तज्ञांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. पेपरमध्ये दिल्या जाणाऱ्या जाहिराती सह चित्रफीत, ऑडिओ, यांच्यासह अन्य मजकूर हा बारीक तपासण्यात येत आहे. 
त्यामुळे काही अप्रिय घटना कोणता तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. या समितीला एखादी मजकूर नाकारण्याचा अधिकार आहे. त्याच्या या निकाल विरोधात ते राज्यस्तरीय अपिलेट समितीकडे दाद मागू शकतात. यांच्या विरोधात न्यायालयात दात मागता सुद्धा येते 

ही सर्व परवानग्या देत असून उमेदवार याच्या जाहिराती ह्या विना परवानगीने प्रसिद्ध होत नाही ना ? झाल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यासाठी सज्ज आहे. एफ. एम., रेडीओ, स्थानिक केबल न्युज चॅनल सह युट्यूब इतर माध्यमावर बारीक लक्ष ठेवण्यात आले आहे. पेड न्युज संदर्भात दक्ष असून सर्व जिल्ह्यातील व राज्यातील पेपर चे कटींग करण्यात येत आहे तसे अहवाल पाठविण्यात येत आहे. 

Web Title: marathi news jalgaon pramanikaran camity 24 hour