मठ विक्रेत्याची मुलगी झाली 'पीएसआय ' 

लक्ष्मी करंकार यांच्या सत्काराप्रसंगी वडील सुरेश करंकार, आई चंद्रकला करंकार
लक्ष्मी करंकार यांच्या सत्काराप्रसंगी वडील सुरेश करंकार, आई चंद्रकला करंकार

पहूर (ता. जामनेर) ः 
'"कष्टाचे व्हावे चांदणे... 
यशाचा चंद्र दिसावा... 
मुलीच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण... 
प्रगतीचा इंद्रधनुष्य असावा.
.' या काव्य पंक्ती खऱ्या करून दाखविल्या आहेत पहूर (ता. जामनेर) येथील मठ विकून चरितार्थ चालविणाऱ्या सुरेश दामू करंकार यांनी. मुलगी 'लक्ष्मी'ने आतिशय प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्वल यश प्राप्त केले असून, पोलीस उपनिरीक्षकपदावर नियुक्‍ती झाली आहे. 
पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजूरी करण्यासोबतच दररोज सकाळी "भाजीचे मठ' अशी आरोळी देत दारोदार मठ विकून दोन पैसे मिळवून मुलीचे शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेल्या सुरेश दामु करंकार यांच्या कष्टाचे "लक्ष्मी'च्या यशाने चिज झाले आहे. 
गावातील जिल्हा परिषद कन्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षण 'लक्ष्मी'ने पहुर येथील आर .टी. लेले विद्यालय आणि स्व. शेठ राजमल लखीचंद ललवाणी विद्यालय, शेंदूणी येथे घेतले. जळगावला अध्यापिका महाविद्यालयात डीटीएड पदवीका प्राप्त केल्यानंतर शिक्षक अभियोग्यता चाचणी तसेच टीईटी परीक्षाही उत्तीर्ण झाल्या. परंतू अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगलेल्या 'लक्ष्मी'ने स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाचा ध्यास घेतला आणि पोलीस उपनिरीक्षक पद प्राप्त केले. सासरच्या मंडळीनेही विषेशतः पती राहूल अशोक चौधरी (एरंडोल) यांनी त्यांना विशेष सहकार्य केले.'लक्ष्मी'च्या यशाने गावात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे . माहेर आणि सासर दोघंही ठिकाणी त्यांचे कौतूक होत आहे. आई- वडिलांच्या कष्टाची जाण ठेवली तर बिकट आर्थिक परिस्थितीवर मात करून आपण आपले ध्येय गाठू शकतो; हाच धडा 'लक्ष्मी'च्या रूपाने घातला गेला आहे. 

"माझ्या आई- वडिलांच्या कष्टाचे चिज झाल्याचा मला अतिशय आनंद आहे. विद्यार्थ्यांनी प्रथमतः ध्येय निश्‍चित करावे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सातत्य, वेळेचे व्यवस्थापन आणि संयम राखला पाहिजे. माझ्या पतीने- सासरच्या मंडळीने केलेल्या सहकार्यामुळेच मी हे यश मिळवू शकले. पोलीस दलात काम करताना महीला सबलीकरणावर विशेष लक्ष देणार आहे. 

लक्ष्मी सुरेश करंकार, पीएसआय, पहूर. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com