जिल्ह्यात एक हजार 853 शेततळी पूर्ण 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 23 एप्रिल 2018

जिल्ह्यात एक हजार 853 शेततळी पूर्ण 

जिल्ह्यात एक हजार 853 शेततळी पूर्ण 

जळगाव ः मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यात दोन हजार शेततळी निर्माण करण्याचा लक्षांक देण्यात आला होता, पैकी आतापर्यंत 1 हजार 853 शेततळी पूर्ण झाली आहेत. तर 28 शेततळ्यांची कामे सुरू आहेत. या योजनेतंर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 8 कोटी 47 लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 111 शेततळी शिंदी (ता. चाळीसगाव), नगाव (ता.अमळनेर) येथे 55 शेततळी पूर्ण झाली आहे. यामुळे ही योजना शेतकऱ्यांना संजीवनी ठरत आहे. 
2017-18 या वर्षात जिल्ह्यात 1 हजार 251 शेततळे पूर्ण करण्यात आली. अनुदान म्हणून 5 कोटी 76 लाख निधी दिला होता. यापैकी 5 कोटी 70 लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आले आहे. 2016-17 या वर्षात एकूण 574 शेततळे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी प्राप्त झालेल्या 2 कोटी 76 लाखांचा निधी अनुदान म्हणून शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यात आला आहे. 

चौकट 
कृषी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन 
या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळावा, याकरिता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून, वारंवार आढावा घेऊन जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. 
----------- 

 

Web Title: marathi news jalgaon purn