आर.आर.विद्यालयाच्या निकालात गोंधळ : प्रगतीपुस्तकावर स्वाक्षरी नाही 

live photo
live photo

जळगाव: शहरातील आर.आर.विद्यालयातील 5 वी ते 9 पर्यंतच्या विद्यार्थ्याना शाळेने प्रगतीपत्रक वाटप केले नाही, मुख्याध्यापकांची सही नसल्यामुळे केवळ मोबाईलमध्ये पालकांनी फोटोकॉपी देण्यात आल्या.तर दुसरीकडे पाचवी च्या विद्यार्थ्यांच्या "फि'चा घोळ झाल्याने विद्यार्थ्यांचे निकालपत्राची फोटोकॉपीही दाखविण्यात आली नाही. त्यामुळे शाळेत एकच गोंधळ उडाला होता. पालक, आणि संस्थाचालक यांच्यात वादही झाला. 
शहरातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे निकाल आज जाहिर करण्यात आले. आर.आर.शाळेतील विद्यार्थ्याचे निकालही आजच असल्याने पालक निकालपत्र घेण्यास गेले होते. मात्र शाळेतर्फे संबधित पालकांना मुलांचे निकालपत्र देण्यात आले आहे. मुख्याध्यापकाची सही नसल्यामुळे आम्ही हे निकालपत्र देवू शकत नाही. असे शिक्षकांनी पालकांना सांगितले. केवळ मोबाईलमध्ये फोटोकॉपी काढून घेण्यास सांगण्यात आले. ज्या पालकांनी मोबाईल आणले होते. त्यांनी फोटो कॉपी काढून घेतल्या परंतु मोबाईल न आणलेल्या पालकांची आणि विद्यार्थ्यांचीही तारांबळ उडाली त्यामुळे शाळेच एकच गोंधळ झाला. 

इयत्ता पाचवीत प्रवेश घेतांना फि भरावी लागते. त्यावेळी तत्कालीन मुख्याध्यापकांनी या फिचा कोणताही हिशेब दिलेला नाही. त्यामुळे ही फि भरली आहे किंवा नाही याची माहिती या अर्जाव्दारे पालकाकडून भरून घेण्यात येत आहे. 
दिलीप लाठी अध्यक्ष, ईस्ट खानदेश इज्युकेशन सोसायटी जळगाव 

प्रभारी मुख्याध्यापक पदाचा माझ्याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी 31 मार्च2019 पर्यतच पदभाराचे पत्र दिले आहे. तसेच माझी तब्बत बरी नसल्यामुळे आपण पुढे कारभार सांभाळण्यास असमर्थ असल्याचे संस्थाध्यक्ष व शिक्षणाधिकऱ्यांना दिले आहे. 
जयांशू पोळ, प्रभारी मुख्याध्यापक, आर.आर.विद्यालय 
 
प्रभारी मुख्याध्यापकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची मुदत संपलेली असेल तर नवीन प्रभारी मुख्याध्यापकाची नियुक्ती करण्याचे पत्र आपण लवकरच देणार आहोत. 
देविदास महाजन, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद जळगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com