गेटमनच्या प्रसंगावधानामुळे टळली दुर्घटना 

live photo
live photo

जळगाव : शिवाजीनगरचा उड्डाणपूल तोडण्याच्या कामाला आजपासून सुरवात झालेली असल्याने आसोदा रेल्वेगेटजवळ मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. आज दुपारच्या सुमारास या कर्नाटक एक्‍स्प्रेस येत असल्याने रेल्वेगेट बंद झाले आणि रुळावर दोन वाहने अडकून गेली. हा प्रकार गेटमनच्या लक्षात या गेटमनने हातात लाल झेंडा घेत रेल्वेरुळावर धावत जाऊन त्याने धावत्या गाडीला थांबविले. त्यामुळे रुळावर अडकलेल्या वाहनातील प्रवाशांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. 
रेल्वे पुलावरून होणारी वाहतूक दूध फेडरेशनजवळील सुरत रेल्वेगेट व आसोदा रेल्वेगेट या ठिकणाहून वळविण्यात आली आहे. त्यामुळे सकाळपासून दुचाकीस्वारांसह एसटी बस व अवजड वाहनांची वाहनांची कोंडी निर्माण होत आहे. या कोंडीमुळेच आज दुपारी दीडच्या सुमारास जळगावकडून भुसाळवकडे मालगाडी जात होती तर भुसावळकडून कर्नाटक एक्‍स्प्रेस जळगाव रेल्वेस्थानकाकडे येत होती. याचवेळी ही गाडी आसोदा रेल्वेगेटपर्यंत आली असता गेटमनने रेल्वेचे गेट बंद करून टाकले. याचवेळी कोंडीमध्ये एक प्रवासी रिक्षा व चारचाकी वाहन हे रुळाच्या मधोमध अडकून गेले. हा सर्व प्रकार गेटमन सुरेश पुंडलिक कलाल यांच्या लक्षात आला. यावेळी त्यांनी तत्काळ हातात लाल झेंडा घेत समोरून येत असलेल्या ट्रेनसमोर धावत जाऊन त्यांनी गेटपासून काही अंतरावर कर्नाटक एक्‍स्प्रेला थांबविले. 

नागरिकांनी अनुभवला थरार 
रुळावर अडकलेल्यांचा जीव वाचविण्यासाठी प्रसंगावधान राखत गेटमन सुरेश कलाल हे आपल्या जीव मुठीत घेऊन गाडी थांबविण्यासाठी रेल्वेच्या समोर धावत सुटले. हा काळजाचा ठोका चुकविणारा थरार रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूला असलेल्या नागरिकांनी अनुभवला. 

प्रकार मोबाईलमध्ये कैद 
वाहनातील प्रवाशांना वाचविण्यासाठी गेटमन हातात झेंडा घेऊन धावत्या एक्‍स्प्रेसला थांबविण्यासाठी रेल्वेच्या समोर धावत असलेला सर्व प्रकार नागरिक बघत होते. अनेकांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. तर काही नागरिकांनी गेटमन श्री. कलाल यांनी केलेल्या कार्याचा गौरव देखील केला. 

..अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती 
रेल्वे रुळावरून एकाचवेळी अप व डाऊनच्या दोन्ही गाड्या आल्याने रुळावर उभ्या असलेल्या वाहनातील प्रवाशांची चांगलीच भांबेरी उडून गेली होती. गेटमन श्री. कलाल यांनी मालगाडीच्या चालकाला वायरलेस यंत्रणेद्वारे मॅसेज देऊन त्याला रेल्वेस्थानकावरून काही अंतरावर गाडी थांबविण्याचे सांगून त्यांनी भुसावळ कडून येणाऱ्या कर्नाटक एक्‍स्प्रेच्या समोर हातात लाल रंगाचा झेंडा घेऊन धावत सुटले. हा सर्व प्रकार एक्‍स्प्रेसचालकाच्या लक्षात आल्यामुळे त्या चालकाने गती कमी करून गाडी आसोदा रेल्वेगेटच्या काही अंतरावर थांबविली. त्यामुळे याठिकाणी होणारी घटना गेटनमन श्री. कलाल यांच्या प्रसंगावधानामुळे टळली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com