मुंबई, सुरत पॅसेंजर २३ दिवस बंद राहणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 एप्रिल 2019

भुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे तिसऱ्या रेल्वे लाइनच्या कामासाठी भुसावळ ते भादली दरम्यान तांत्रिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई व सुरत पॅसेंजर या दोन्ही गाड्या २३ एप्रिल पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे चाकरमाने तसेच प्रवासी वर्गाचे मोठे हाल होणार आहेत. 

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील भुसावळ- भादली विभागा दरम्यान नवीन तिसऱ्या रेल्वे लाइनचे काम आणि नॉन इंटर लॉकिंगचे कार्य करण्यात येत आहे. त्यामुळे तांत्रिक ब्लॉक घेण्यात येणार असून २३ एप्रिल पर्यंत या मार्गावरील मुंबई व सुरतकडे जाणाऱ्या येणाऱ्या पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात गाडी क्रमांक ५११५४ अप भुसावळ-मुंबई पॅसेंजर ही गाडी १ ते २३ एप्रिल पर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ५११५३ डाऊन मुंबई - भुसावळ पॅसेंजर गाडी ही सुद्धा १ ते २३ एप्रिल पर्यत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ५९०७६ अप आणि ५९०७५ डाऊन भुसावळ- सुरत पॅसेंजर, गाडी क्रमांक ५९०७८ अप आणि ५९०७७ डाऊन भुसावळ-सुरत पॅसेंजर ह्या गाड्या सुध्दा रद्द करण्यात आली असल्याची माहिती भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागातर्फे प्रसिद्धी पत्रकान्वये देण्यात आली आहे.

Web Title: marathi news jalgaon railway surat mumbai passenger cansal