रेल्वेच्या जळगाव-मनमाड तिसऱ्या मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू 

रेल्वेच्या जळगाव-मनमाड तिसऱ्या मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू 

जळगाव ः भारतीय रेल्वेला देशात दुसऱ्या क्रमांकाचे उत्पन्न मिळवून देणारा विभाग म्हणून भुसावळ रेल्वे विभागाकडे पाहिले जाते. प्रवाशांना अधिक जलद गतीने सेवा देता यावी, रेल्वेस्थानकात येण्यापूर्वी रेल्वे गाड्यांचा वेळेचा खोळंबा होऊ नये, यासाठी रेल्वेने जळगाव ते मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गासाठी 160 कोटींचा आराखडा तयार आहे. त्यासाठी रेल्वेकडे त्यांच्या मालकीची जमीन आहे. शिवाय 25 हेक्‍टर जमिनी अधिक संपादन करावी लागणार आहे. त्या जमिनीची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. 
सध्या जळगाव ते मुंबईकडे येण्यासाठी अप व डाऊन असे दोनच मार्ग आहे. दिवसभरात या मार्गावरून तब्बल दीडशेपेक्षा अधिक रेल्वेगाड्या जातात व येतात. असे असताना मालगाड्यामुळे प्रवासी मेल, एक्‍स्प्रेस गाड्यांच्या वेळेचा खोळंबा होतो. तो टाळून प्रवाशांना कमी वेळेत अधिक अंतरावरचा आपला प्रवास व्हावा, यासाठी मध्य रेल्वेने जळगाव ते मनमाड व मनमाड ते जळगाव अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाने काम करण्याचे काम हाती घेतले आहे. अगोदर जळगाव ते मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गासाठीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 
160 कोटींच्या आराखडा पूर्ण करण्यास किमान दीड ते दोन वर्षाचा कालावधी आहे. 
तिसऱ्या रेल्वेमार्गासाठी रेल्वेच्या मालकीची जमीन आहे. जळगाव ते मनमाड पर्यंत केवळ 20 ते 25 हेक्‍टर जागा अतिरिक्त घ्यावी लागणार आहे. यात जळगाव, पाचोरा, चाळीसगाव आणि येवला तालुक्‍यात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. 
हे काम दोन टप्प्यात एकावेळी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात जळगाव ते शिरसोली 12 किलोमीटर अंतरासाठी 4 किलोमीटर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. 
जळगाव व येवला तालुक्‍यात लागणाऱ्या जमिनीचा अवॉर्ड अद्यापपर्यंत प्रांताधिकाऱ्यांकडून जाहीर होणे बाकी आहे. तो जाहीर होताच रेल्वेकडून संबंधित शेतकऱ्यांना मोबदला दिला जाईल. 

भादली-भुसावळचे काम पूर्ण 
जळगाव ते भादली 11.5 किलोमीटरचा आहे. दुसरा टप्पा भादली ते भुसावळ 12.5 किलोमीटर अंतराचा आहे. त्यात तिसऱ्या मार्गाचे भादली ते भुसावळ काम पूर्ण झाले आहे. 5 फेब्रुवारीला चाचणी यशस्वी झाली. तिसरी लाइन भुसावळ यार्डात जोडण्यात आली आहे. भादली येथे लाइन जोडणीचे काम सुरू आहे. यादरम्यान गिट्टीचा भराव टाकणे तसेच रेल्वेच्या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. यात 37 लहान तर 4 मोठे पूल आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com