जळगावात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

भुसावळ : भुसावळ विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या विशेष पथकाने सुरू केलेल्या ई-तिकिटांच्या काळाबाजारावर मोहिमेत दोन दिवसांपूर्वी अकोला येथे ई तिकिटांचा काळाबाजार उघड केल्यानंतर काही तासातच पुन्हा जळगाव येथे धडक कारवाई करुन सुमारे 65 हजार रुपयांच्या 40 तिकीटांसह एकास ताब्यात घेतल्याची कारवाई आज (ता. 27) केली. 

भुसावळ : भुसावळ विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या विशेष पथकाने सुरू केलेल्या ई-तिकिटांच्या काळाबाजारावर मोहिमेत दोन दिवसांपूर्वी अकोला येथे ई तिकिटांचा काळाबाजार उघड केल्यानंतर काही तासातच पुन्हा जळगाव येथे धडक कारवाई करुन सुमारे 65 हजार रुपयांच्या 40 तिकीटांसह एकास ताब्यात घेतल्याची कारवाई आज (ता. 27) केली. 

रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने अकोला येथील एका कॅफेवर छापा मारून तिघांना साहित्य व तिकीटांसह ताब्यात घेतले होते. यानंतर विशेष पथकाचे निरीक्षक प्रवीणकुमार कस्बे, उपनिरीक्षक अंबिका यादव, समाधान वाहुळकर, संजीव राय, मुख्य आरक्षक मिलिंद तायडे, आरक्षक मनीष शर्मा, विनोद जेठवे यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काल सापळा रचून राजेश देवराम सोनवणे यांच्या नटवर टॉकीज जवळील ओम शिवशक्ती ऍण्ड ट्रॅव्हल्स या दुकानावर छापा टाकला. अनधिकृतरीत्या काढण्यात आलेले 30 ई-तिकिटे व आरक्षण केंद्रावरून काढलेले 10 तिकिटे अशा 65 हजार 484 रुपयांचे 40 तिकिटे, संगणक, प्रिंटरसह आरोपीस रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतले. संशयित राजेश सोनवणे यास भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यास 5 दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

या कारवाईबाबत अजय प्रकाश दुबे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत असून तांत्रिकदृष्ट्या मदतीसाठी चांगली पकड असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होईल. येत्या वर्षभरात रेल्वेत सायबर सेल सुरू होऊ शकते. तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये अद्यापही जनजागृतीची गरज आहे. तिकिटांवरील टोल फ्री क्रमांकाचा वापर गरजू प्रवासी घेत नसल्याची खंत ही त्यांनी व्यक्त केली. लवकरच महिला आरक्षित डबे वेगळ्या रंगात व मध्यभागी लागणार असून खिडक्‍यांना जाळ्या आणि डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. अशा प्रकारे महिलांच्या सुरक्षिततेसाठी 100 टक्के प्रयत्न केले जात आहेत. या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाची हिरवी झेंडी मिळाली आहे. प्रवाशांना अधिकृत व निर्धारित दरात तिकीट मिळण्यासाठी आरपीएफ विभाग कारत आहे. तिकिटांचा काळाबाजार थांबविण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी टोल फ्री क्रं.182 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: marathi news jalgaon railway tickit black