सुरत रेल्वेगेटजवळ जीवघेणे "पत्र्याचे डिव्हाडर' 

live photo
live photo

जळगाव ः पर्यायी रस्ता तयार न करता शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे शिवाजीनगर व परिसरातील नागरिकांना दोन रेल्वेगेट क्रॉसिंग करण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. हेच कमी की काय म्हणून आता सुरत रेल्वेगेटजवळ जीवघेणे पत्र्याचे दुभाजक (डिव्हायडर) लावण्यात आले आहेत. हा प्रकार म्हणजे हेतुपुरस्सरपणे कोणी नागरिकांच्या जीवाशी खेळ करीत आहे की काय? असाच प्रश्‍न उपस्थित होत आहे. 
शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम झाले पाहिजे, अशी नागरिकांची अनेक दिवसांची मागणी होती. मात्र, तीच मागणी आता शिवाजीनगर परिसरातील नागरिकांच्या जिवावर बेतणारी ठरत आहे. काम सुरू होताना पर्यायी मार्ग उपलब्ध केला जाईल, अशी जनतेची अपेक्षा होती. मात्र, ती पूर्ण न करताच त्या आधीच काम सुरू केले. 

दोन रेल्वेगेटचा धोका? 
शिवाजीनगर तसेच परिसराकडून शहरात येणाऱ्या नागरिकांना सुरत रेल्वेगेटशिवाय कोणताही अन्य पर्यायी मार्ग नाही. यामुळे वाहनधारकांना दहा किलोमीटरच्या फेऱ्याने टॉवर चौकात यावे लागते. यात सुरत व पिंप्राळा हे रेल्वेगेट ओलांडावे लागत आहेत. मात्र, सध्या हा धोका पत्करून नागरिक येत आहेत. 

पत्र्याचे दुभाजक 
रेल्वेगाडी आल्यानंतर सुरत रेल्वेगेटवर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होते. गेट उघडल्यावर वाहनांच्या होणाऱ्या गर्दीमुळे वाहतुकीचा खोळंबा होता. यावर मार्ग काढण्यासाठी या ठिकाणी दुभाजक बसविले आहेत. मात्र, ते पत्र्याचे आहेत. रस्त्यावर खड्डे खोदून त्यावर जुने पत्रे एखाद्या ग्रामीण भागात कुंपन करावे तसे लावले आहेत. या ठिकाणी गर्दी झाल्यास या पत्र्यांचा धोका आहे. याच पत्र्यांमुळे दुर्घटना होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

"फायबर डिव्हाडर' का नाही? 
शहरात अनेक ठिकाणी "फायबरे डिव्हायडर' लावले आहेत. अजिंठा चौफुलीजवळ चारही बाजूस "फायबर डिव्हाडर' आहेत. त्यांच्यामुळे कोणताही धोका नाही. असे "डिव्हायडर' या ठिकाणी का बसविले नाहीत? असे "पत्र्याचे डिव्हायडर' बसवून जनतेच्या जीवाशी का खेळ केला जात आहे? आधीच त्रस्त नागरिकांना आणखी जादा त्रास देण्याचा हा प्रकार असल्याचे दिसते. त्यामुळे तातडीने ते बदलून त्या ठिकाणी "फायबर डिव्हायडर' लावावेत, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. 

शाहूनगरातील रस्ता दुरुस्ती कधी? 
पिंप्राळा रेल्वेगेटपासून थेट गोविंदा रिक्षाथांब्यापर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला आहे. शाहूनगर भागातील जुन्या कृषी महाविद्यालयाजवळ तर रस्त्यावर मोठमोठे दगड वर आलेले आहेत. त्या ठिकाणी तत्काळ डांबरीकरण करणे गरजेचे आहे. मात्र, महापालिका अधिकाऱ्याकंडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. ही रस्ता दुरुस्ती कधी होणार, याची नागरिकांना प्रतीक्षा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com