पाऊस पडण्याच्या दिवसांमध्येही अनियमितता! 

सचिन जोशी
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

जळगाव : सातत्याने पडणाऱ्या दुष्काळास पाऊस पडण्याच्या दिवसांमधील अनियमितताही कारणीभूत आहे. गेल्या दहा वर्षांत जळगाव जिल्ह्यात केवळ दोनदाच पावसाने सरासरी ओलांडली. 2015 मध्ये पावसाचे दिवस अवघे 71 होते, तर 2013 मध्ये सर्वाधिक 122 दिवस पाऊस पडल्याची नोंद आहे. 
राज्यात आणि पर्यायाने जळगाव जिल्ह्यातही जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाळ्याचे मानले जातात. या चार महिन्यांत किती दिवस पाऊस पडला, त्यावर त्या वर्षातील पावसाचे दिवस ठरविले जातात. बऱ्याचदा ऑक्‍टोबरमध्येही पाऊस पडतो; परंतु तो नियमित स्वरूपाचा नसला तरी ऑक्‍टोबरमधील पावसाचे दिवसही महसूल प्रशासनाच्या नोंदीत गृहीत धरले जातात. 

2015 मध्ये सर्वांत कमी दिवस 
साधारण 2009 ते 2018 या दहा वर्षांच्या काळात पावसाच्या दिवसांमध्ये कमालीची अनियमितता राहिली आहे. हे प्रमाण साधारणत: 70 ते 120 दिवस असे राहिले आहेत. या दहा वर्षांत सर्वांत कमी म्हणजे अवघे 71 दिवस पाऊस पडला, तो 2015 मध्ये. असे असले तरी त्याची सरासरी 64.3 टक्के होती. 

2013 मध्ये सर्वाधिक 
जिल्ह्यात 2013 मध्ये सर्वाधिक 122 दिवस पाऊस पडला. याच वर्षांत ऑक्‍टोबरमध्येही तब्बल 16 दिवस पाऊस पडला होता व जिल्ह्यातील पावसाची सरासरी तब्बल 127.6 टक्के होती. यात 2012 या वर्षात 92 दिवस पाऊस पडला असला, तरी तो या दशकातील सर्वांत कमी म्हणजे फक्त 59.6 टक्केच होता. गेल्या वर्षी म्हणजे 2018 मध्येही अवघे 85 दिवस पाऊस पडला. त्याची सरासरी 67.3 टक्के होती. त्यामुळे जिल्ह्याला यावर्षीच्या ऑगस्टपर्यंत टंचाईच्या झळा जाणवल्या. 

अपवाद वगळता दरवर्षी पाऊस! 
आपल्या भागात जून ते सप्टेंबर असा पावसाळा असतो व साधारणत: याच चार महिन्यांत किती दिवस पाऊस पडला, त्यावरून पावसाचे दिवस काढले जातात. बऱ्याचदा ऑक्‍टोबरमध्येही पाऊस पडतो. दिवसाला जिल्ह्यात सरासरी 2 मिलिमीटर पाऊस पडल्यास तो दिवस पावसाचा धरला जातो. गेल्या दहा वर्षांत ऑक्‍टोबर महिन्यात फक्त गेल्या वर्षीचा (2018) अपवाद वगळता दरवर्षी पाऊस पडला आहे. 
 
दहा वर्षांतील पावसाचे दिवस 
वर्ष-------दिवस---- टक्केवारी 
2009---77------77.5 
2010----111----112.2 
2011----96-----91 
2012----92-----59.6 
2013----122---127.6 
2014---86-----92.7 
2015----71-----64.3 
2016----108----95.8 
2017---101----72.6 
2018----85-----67.3 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon rain days