जळगावात पावसाची सकाळपासून संततधार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

जळगाव ः अनेक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी तुरळक हजेरी लावली. परंतू, दोन दिवस विश्रांती घेवून उन्हाचे चटके देखील जाणवले. मात्र आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण होवून अगदी पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे. आजच्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, बळीराजा देखील सुखावला आहे. 

जळगाव शहरासह परिसरात आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. काही ठिकाणी अधूनमधून जोरदार पाऊसही झाला. शहरात देखील पाऊस सुरू असल्याने अनेकांची तारांबळ उडाली. पाऊस स्थिरावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. यानंतर दोन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. आषाढ संपल्यानंतर श्रावणाला सुरवात झाली, तशी दडी मारलेल्या पावसाचे देखील सुखद आगमन झाले. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणाचा अनुभव जिल्हावासीयांना येत आहे. परंतू, बुधवारी (ता.15) दुपारी कडक उन्हाचे चटके देखील जाणवत होते. यासोबतच उकाड्यात देखील प्रचंड वाढ झाल होती. मात्र आज सकाळपासूनच शहर व पसिरातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरुच आहे. संततधार सुरू असल्याने चाकरमान्यांची चांगलीच धावपळ उडाली. पावसामुळे अनेकजण उशिराने कार्यालयात पोहचले होते. पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. 

उडीद- मुगाला फायदा 
पावसाने दडी मारल्यामुळे पिकांना पाण्याची आवश्‍यकता भासत असते. यातच उडीद आणि मुग फलांवर आले असून, काही ठिकाणी शेंगा देखील लागल्या आहेत. यामुळे उडीद आणि मुगाला पाण्याची गरज होती. यामुळे बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागून होत्या. पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला असून, या पावसाचा फायदा उडीद- मुगाला अधिक होणार आहे. 

Web Title: marathi news jalgaon rain droped