वादळी पावसामुळे जिल्ह्यातील 250 हेक्‍टरचे नुकसान 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

जळगाव : गेल्या पाच-सहा दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. या वादळी पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, यामध्ये जिल्ह्यात सुमारे 250 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान बागायती केळीचे झालेले असल्याने त्याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. 

गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. या अवकाळी वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील लावण्यात आलेले ज्वारी, मका, कपाशी, बाजरी, सोयाबीन, केळी, लिंबू यासह फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात ता. 14 ते 16 पर्यंत झालेल्या वादळी पावसामुळे सुमारे 250 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या शेतशिवारांचा तलाठ्यांसह तहसीलदारांकडून पंचनामा करण्यात आला असून, यात 75 गावातील 493 शेतकरी बाधीत ठरले आहेत. जिल्हा प्रशासनाला अधिकाऱ्यांकडून हा अहवाल आज प्राप्त झाला असून शेतकऱ्यांना वादळी पावसामुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी. यासाठी हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. 

208 हेक्‍टर केळीचे नुकसान 
जिल्हाभरात झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील गावांमधील 250 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान केळी पिकाचे असून, जिल्हाभरातील 75 गावांमधील 208 हेक्‍टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. 

493 शेतकरी बाधित 
वादळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र तहसीलदार व तलाठ्यांकडून पंचनामा करण्यात आला नव्हता. दरम्यान, काल या सर्व गावांचा पंचनामा करण्यात आला असून, यामध्ये 75 गावांमधील 493 शेतकरी नुकसानग्रस्त बाधित असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली. 

केळी पिकाचे चोपड्यात अधिक नुकसान 
जिल्हाभरात झालेल्या वादळी पावसामुळे चोपडा तालुक्‍यातील 44 गावांमध्ये केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल मका पिकाचे 22.7 हेक्‍टर तर लिंबू पिकाचे 13 हेक्‍टर नुकसान झाले आहे. 

Web Title: marathi news jalgaon rain droped 250 hecter banana