महाराष्ट्र पाण्याखाली, जिल्ह्यात केवळ शिडकावाच! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

जळगाव ः राज्यातील मुंबई, नाशिक, पुणे आदी भागांत धुव्वाधार पावसाने नद्या- नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. जळगाव जिल्ह्यातही पाऊस आहे. वाहून निघेल असा पाऊस मात्र झालेला नाही. संपूर्ण राज्यात पावसाचे तांडव सुरू असताना जळगाव जिल्ह्यासह परिसरात तुरळक पाऊस असल्याने बहुतांश प्रकल्पांमध्ये अद्याप ठणठणाट आहे. हतनूर धरणाच्या जलाशयात मध्य प्रदेश व विदर्भातील पाणी येत असल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले. यामुळे "तापी'ला पूर आला आहे. मात्र "गिरणा', "वाघूर' यांसह अनेक नद्यांना पूर नाही. 

गेल्या आठवडाभरापासून उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह मुंबई, ठाणे व उपनगरे, पुणे, पश्‍चिम महाराष्ट्रासह विदर्भातही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. सर्वत्र पावसाने तांडव सुरू केले असून, अर्धा महाराष्ट्र आजच्या तारखेत पाण्याखाली गेलेला आहे. सर्वच विभागांतील नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, नद्यांच्या पुराचा असंख्य गावांना विळखा पडल्याने त्यांचा संपर्क तुटला आहे. 

जळगाव जिल्ह्यात तुरळक 
राज्यभर पावसाची ही स्थिती असताना जळगाव जिल्हा मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही अद्याप कोरडाच आहे. नाही म्हटले तरी गेल्या पंधरवड्यापासून जळगाव जिल्ह्यात कमी- अधिक प्रमाणात पाऊस बरसत आहे. दोन- चार दिवसांपासून सातत्याने पावसाची सरी येत आहेत. मात्र, त्या अगदीच तुरळक स्वरूपाच्या आहेत. जामनेर, भुसावळसह काही तालुक्‍यांमध्ये चांगला पाऊस होऊन उपनद्या वाहू लागल्या असल्या, तरी "तापी' वगळता "गिरणा', "वाघूर', "अंजनी', "गूळ', "बोरी', "सुकी' आदी नद्या अद्याप कोरड्याठाक आहेत. स्वाभाविकत: या नद्यांवरील प्रकल्पांमध्येही जलसाठा नाही. एक-दोन प्रकल्प काय ते थोडेफार भरले. काही प्रकल्पांमध्ये अल्प साठा आहे. 

शेतीसाठी उपयुक्त 
गेल्या आठ- पंधरा दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने शेतीलाच काय तो फायदा झाला आहे. आठवड्यापूर्वी करपू लागलेल्या पिकांना या पावसाने जीवदान मिळाले आहे. पावसाने दुबार पेरणीचे संकटही टळले असून, भूगर्भ जलपातळीत वाढ झाली आहे. विहिरी, कूपनलिका "रिचार्ज' झाल्या आहेत. मात्र, नद्या- नाल्यांना पूर नसल्याने पाणीप्रश्‍न कायम आहे. 

धरण--पाणीसाठा दलघमी--टक्केवारी 
हतनूर--209.49--19.14 
गिरणा--385.20--12.82 
वाघूर--227.95--29.86 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon rain droped jalgaon district