पाऊस लांबल्याने जामनेरला दुबार पेरणीचे सावट 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

जळगाव : पाऊस लांबल्याने जामनेर तालुक्‍यात दुबार पेरणीचे संकट उद्‌भवले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांची बियाणे वाया जाण्याची भिती आहे. 

जळगाव : पाऊस लांबल्याने जामनेर तालुक्‍यात दुबार पेरणीचे संकट उद्‌भवले असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांची बियाणे वाया जाण्याची भिती आहे. 
मृग नक्षत्र कोरडे गेले त्यापुर्वीच जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी धुळपेरणी करून टाकली. आता त्यावर पाऊसच नसल्याने लाखो रूपयांची बियाणे वाया जाण्याची भिती आहे. पेरणीनंतर लागलीच त्यावर पाण्याची आवश्‍यकता असते, मात्र पाऊस बराच लांबल्याने शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे सावट घोंगाऊ लागले आहे. गेल्या महिनाभरापासुन ठिबक सिंचनावर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. आता तेथेही विहीरींनी तळ गाठायला सुरूवात केल्याने कपाशी पिकाला पावसाच्या पाण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पाण्याची व्यवस्था नाही अशा बहुतांश कोरडवाहु (जिरायत) शेतकरी चिंताग्रस्त आहे. 
"सात जुननंतर हमखास पाऊस पडेल या विश्वासावर परीसरातील बहूतांश शेतकऱ्यांनी धुळ पेरणी केली. मात्र पेरणीनंतर दहा-बारा दिवसातही पावसाचा पत्ता नाही. कृषी विभागान आवाहन केले तोपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी धुळपेरणी करून टाकली होती. 

दुबार पेरणीचे सावट 
येत्या दोन-तीन दिवसांत जोरदार पाऊस बरसला नाही तर आधीची पेरलेली महागडी बियाणे वाया जाऊन आणखी दुसऱ्यांदा बियाणे घेण्याची भिती परीसरातील असंख्य शेतकरी व्यक्त करीत आहे. यंदाही कपाशीचा पेरा जास्त आहे, त्यामुळे लांबलेल्या पावसाने आर्थिक नुकसान होणार आहे.

Web Title: marathi news jalgaon rain dubar perni