"मेगारिचार्ज'च्या कामासाठी जलशक्तीमंत्र्यांना साकडे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

जळगाव : तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यासाठी या प्रकल्पाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार, महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील खासदार, आमदार, केंद्रीय भूजल मंडळाचे अधिकारी, व सरकारी अधिकारी यांची एकत्रित बैठक घ्यावी, अशी विनंती खासदार रक्षा खडसे यांनी जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना केली आहे. आज यासंदर्भात त्यांनी श्री. शेखावत यांची भेट घेतली. 

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील तापी नदीवर प्रस्तावित महाकाय पुनर्भरण योजनेसाठी (तापी मेगा रिचार्ज प्रोजेक्‍ट) तापी खोऱ्याचे अद्ययावत तंत्रज्ञानाने हवाई सर्वेक्षण ऑगस्ट 2018 मध्ये वॅपकॉस संस्थेमार्फत करण्यात आले. केंद्र सरकारने 2014 मध्ये टास्क फोर्सचे गठण करून महाकाय पुनर्भरणाचा प्रस्ताव सहा महिन्यांत तयार करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर जानेवारी 2016 मध्ये तत्कालीन केंद्रीय जलसंसाधनमंत्री उमा भारती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे यांनी हवाई पाहणी केली होती. 

लाखो हेक्‍टर जमिनीला लाभ 
या योजनेमुळे प्रत्यक्ष सिंचन 1 लाख 2 हजार हेक्‍टरमध्ये होणार असून, महाराष्ट्रात 24 हजार हेक्‍टर, तर मध्य प्रदेशात 78 हजार हेक्‍टरमध्ये होईल. पुनर्भरणाद्वारे महाराष्ट्राच्या 2 लाख 11 हजार हेक्‍टर क्षेत्रास अप्रत्यक्ष लाभ होईल. प्रकल्पाचे काम सुरू केल्यानंतरही अनेक वर्षे चालेल. त्यामुळे या कामाला गती द्यावी, त्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी, त्या भागातील लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घ्यावी, अशा आशयाचे निवेदन रक्षा खडसेंनी शेखावत यांना दिले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon raksh khadse pm mega richarge