तांबापुरात दीड लाखांचा गुटखा पकडला 

तांबापुरात दीड लाखांचा गुटखा पकडला 

जळगाव : शहरातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. निलभ रोहन यांच्या पथकाने बुधवारी रात्री तांबापुरा भागातील खुशी किराणा ऍण्ड पान मसाला या दुकानातून एक लाख 9 हजार रुपये आणि वॅगनार कार असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याचवेळी सिंधी कॉलनीतील साईनाथ ट्रेडर्समधून 30 हजार रुपयाचा गुटखा ताब्यात घेत धडक कारवाई केली आहे. 
याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी अनिल कृष्णराव गुजर यांनी फिर्याद दिली. 30 जानेवारीला रात्री साडेआठला खुशी पान मसाला येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. रोहन, पोलिस निरीक्षक रणजित शिरसाठ, पोलिस उपनिरीक्षक रमेश वावरे यांच्यासह पथकाने छापा टाकला. याठिकाणी राज्यात बंदी असलेला विमल पान मसाला, सुगंधित तंबाखू, सागर पान मसाला मिळून आला. एकूण एक लाख 9 हजार 8 रुपये किमतीचा गुटखा व दोन लाखाची वॅगनार (एमएच 19, सीयू 8418) जप्त केली. 
याप्रकरणी संशयित आरोपी रमेश जेठानंद चेतवानी, सिमरन रमेश चेतवानी, दीपक रमेश चेतवानी (रा.कवरनगर, सिंधी कॉलनी) यांना ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय रमेश वावरे तपास करीत आहेत. 

शहरात धडक कारवाई 
शहरात या आठवडाभरात माजी नगरसेवक अरुण शिरसाठ यांच्या बी. जे. मार्केटसमोरील बाबा प्लाझामधील क्रीडा मंडळावर छापा टाकून जुगार खेळणाऱ्या 45 जणांना अटक केली होती. यानंतर कंजर वाड्यातून गांजा, दाणा बाजारात सट्टा घेणारा तरुण बुधवारी रात्री शहरातील दोन ठिकाणी छापा टाकून सुमारे दीड लाखाचा गुटखा ताब्यात घेतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com