रोजा'मुळे मानवतेची भावना वृद्धिंगत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 मे 2018

रमजान महिन्यात दानधर्माला अधिक महत्त्व आहे. उत्पन्नातील अडीच टक्‍के रक्‍कम जकात म्हणून गरिबांना देऊन जर आर्थिक सहकार्य केले तर पुण्य मिळते असे म्हटले जाते. या पर्वात अल्लाची सर्वांवर नजर असते. या काळात गरिबांना कपडे, अन्नधान्य तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाची मदत देण्याला प्राधान्य देण्यात येते. "रोजा'मुळे मानवतेची भावना वृद्धिंगत होत असल्याच्या भावना महिलांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केल्या. 
 
रमजान महिन्यात खूप कडक रोजा केला जातो. नियमित पंधरा तासांचा रोजा असतो. पहाटे तीनला सैनी करायची असल्याची लवकर उठून जेवण करावे लागते. यानंतर सायंकाळी सातपर्यंत अन्न किंवा पाणी घेत नाही. दिवसभरात तीन वेळेस नमाज अदा करावी लागते. शक्‍यतो मशिदमध्ये जाऊन नमाज अदा करतो. रमजानमध्ये जकात म्हणून गरिबांना मदत, दानधर्म केला जातो. त्यानुसार घरी येणाऱ्या गरिबांना जेवण व कपड्यांची मदत करत असतो. 
-रशीदा चुनावाला
 
रोजांमुळे आपले सर्व पाप धुतले जातात तसेच मन देखील शुद्ध होते. या काळात प्रत्येक वाईट गोष्टीपासून दूर राहिले जाते. महिनाभरात वाईट काही करायचे नाही, ही शिकवण वर्षभर ठेवता येते. रमजान महिन्यात घरात अधिक काम पुरत नसल्याने भूक लागत नाही. पहाटे नाश्‍ता झाल्याने दुपारी ताकद असते. या काळात पुण्य मिळविण्यासाठी सर्वच जण काहीनाकाही दान करत असतात. आम्ही गरीब मुलांना कपडे तसेच आपल्याकडून जे दान करता येईल ते देण्याचा प्रयत्न करत असतो. 
सकिना लहेरी 
 
रमजान महिन्यात रोजे करताना पहाटे नमाज पठण करतो. यानंतर खाणे- पिणे करून साडेचारपासून रोजाला सुरवात होते. यानंतर सायंकाळी सातपर्यंत काहीही खाणे- पिणे न करता आपले घरातील काम सांभाळत असतो. अल्लाचे नामस्मरण करण्यास अधिक वेळ दिला जातो. या काळात उत्पन्नातील अडीच टक्‍के जकात गरिबांसाठी मदत देत असतो. यात अधिकतर अनाथ मुलांना कपडे व अन्न देण्यावर भर असतो. यामुळे मानवतेची भावना वृद्धिंगत होते. 
-अमयेना बंदूकवाला

Web Title: marathi news jalgaon ramjan