आमचा रमजान : जगावे कसे शिकवितो रमजान ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 मे 2018

जळगाव ः रमजान महिन्यातील रोज पंधरा तासांचा रोजा आणि नियमित पाच वेळेसची नमाज अदा होते. हे सारे आपले दैनंदिन काम सांभाळून वेळेचे नियोजन आखूनच साध्य होते. या एक महिन्याच्या कालावधीत मिळणारी ऊर्जा ही वर्षभर कसे राहावे याचा मंत्र देवून जाते. तसेच जीवन कसे जगावे हे शिकविणारा रमजान असतो. शिवाय गरिबांना जकात स्वरूपात दानधर्म करताना आर्थिक मदत असो, की अन्नधान्याचे वाटप हे देखील तितकेच महत्त्वाचे मानले जाते. यातून घरात वर्षभरासाठी एक बरकत राहत असल्याच्या प्रतिक्रिया नोकरदार व व्यावसायिक बांधवांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केल्या. 

रमजानचा संपूर्ण महिनाभर रोजाचे उपवास करत असतो. हे करताना आपले नियमित काम करून पाच वेळची नमाज अदा करणे आणि सायंकाळी उपवास सोडण्याचे नियोजन केले जाते. त्यानुसार महिनाभर हे नियोजन करून काहीही न खाता पिता रोजाचा उपवास करतो. हे करताना अल्लाकडून एक वेगळीच शक्‍ती, ऊर्जा मिळत असते. जकात म्हणून गरीब मुलांना कपडे देतो आणि ईदच्या दोन दिवस अगोदर फितरा म्हणून मदरसामध्ये प्रति माणसी अडीच किलो गहूच्या दराप्रमाणे हवी ती मदत करतो. हे केल्यानंतर कमी जाणवत नाही, तर वर्षभर घरात बरकत राहत असते. 
-मुद्दसर अहमद, नोकरदार. 
 
रमजानच्या महिन्यात आपले काम आणि पाच वेळेसची नमाज अदा केली आणि दुसरे काही केले नाही, तरी भरपूर असते. दैनंदिन काम सांभाळून वेळेवर नमाज अदा करतो; याची एक सवयच होते. जकात म्हणून आपल्याकडील उत्पन्नातील अडीच टक्‍के जकात नातेवाईक व गरिबांना मदत म्हणून द्यायचे असते. इतके नाही होऊ शकले, तरी पाचशे ते हजार रुपयांपर्यंतची मदत करत असतो. यातून मिळणारा आनंद खूप मोठा आहे. 
- शाकिर खान, व्यावसायिक. 
 
रमजान म्हणजे वर्षभर चांगले काम करा, मदत करत रहा याची शिकवण देणारा महिना असतो. या महिन्यात नेहमीप्रमाणे काम सांभाळून नमाज पठण करणे, रोजा इफ्तारसाठी गरजूंना मदत म्हणून अन्न, ड्रायफ्रूट यास पैसे मदत म्हणून देत असतो. यातला आनंद निश्‍चितच मोठा असतो, ज्याचे मोल होऊ शकत नाही. शिवाय, रमजान महिन्यात शांतीचा संदेश देणे आणि जीवन कसे जगावे याची पद्धत शिकवत असतो, त्यानुसारच वर्षभर चालण्याचा प्रयत्न असतो. 
- इरफान सालार, व्यावसायिक. 
 
Web Title: marathi news jalgaon ramjan

टॅग्स