विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचा प्रयत्न!

विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचा प्रयत्न!

जळगाव ः कुराणात उल्लेख असल्याप्रमाणे रमजानमध्ये दिलेल्या जकातीचे पुण्य मानले जाते. याचे योग्य नियोजन करून जकात व्यवस्थितपणे वाटप झाल्यास देशात कोणीही गरीब राहणार नाही. असेच नियोजन करून खऱ्या गरजवंतांना जकात देण्याचे भाग्य घेतो. आर्थिक असो किंवा कपडे, अन्न यासारखी मदत करण्याचे नियोजन आहे. शिवाय आर्थिक स्थितीमुळे शिक्षणात अडचणी असतील तर त्या दूर करून त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचा प्रयत्न रमजाननिमित्त राहणार असल्याचे शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी "सकाळ'ला सांगितले. 

 
रमजानची तयारी आणि नियोजन शाबान महिन्यात म्हणजे रमजानपूर्वी केली जाते. त्यात लागणारे साहित्य खरेदी असो, की रमजानमध्ये दिल्या जाणाऱ्या जकातचे नियोजन हे सर्व आम्ही कुटुंबातील सदस्य एकत्रितपणे करतो. पवित्र कुराणमध्ये उल्लेख असल्याप्रमाणे गरीब आणि गरजूला अडीच टक्‍के जकात दिली जाते. त्यानुसार नातेवाइक किंवा परिसरातील गरिबांना कपडे, शिरखुर्मासाठी लागणारे साहित्य देणार आहे. तसेच गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात ठेवण्यासाठी प्रयत्न राहणार असून, एका विद्यार्थ्याला दत्तक घेऊन त्याचा संपूर्ण शिक्षणखर्च जकातीतून करण्याचा मानस आहे. 
- डॉ. शेख हारून बशीर, मुख्याध्यापक, इकरा उर्दू हायस्कूल 

रमजानचा महिना म्हणजे तकवा असतो. यात प्रत्येक मुस्लिम बांधवाला रोजा पकडणे अनिवार्य असते. केवळ जो कोणी आजारी आहे किंवा प्रवासात आहे त्याला रोजा माफ असतो. एक महिन्यात भूक काय आहे, याची जाणीव प्रत्येकाला होते. तसेच वर्षभरातून एकदा शरीरालाही तंदुरुस्ती मिळते. त्याचप्रमाणे प्रत्येक मुस्लिम सायंकाळी सातला रोजा सोडतो. यात ज्याला गरज आहे अशांना रोजा सोडण्यासाठी अन्न देणे पुण्याचे काम मानले जाते. त्यानुसार गरजवंतांना अन्न, कपडे वाटप करून रमजानची जकात देणार आहे. 
- इक्‍बाल शाह, निवृत्त प्राचार्य 
 
 
रोजा पकडल्याने मनुष्याचा आत्मविश्‍वास आणि आत्मसंयम व संकल्प शक्‍ती वाढण्यास मदत होते. दिवसभर खात- पीत नसल्याने ज्याच्याशिवाय जगणे शक्‍य नाही, त्यावर संयम ठेवतो. म्हणजे इतर गोष्टींवर देखील सहज संयम ठेवण्याची जाणीव होते. तसेच इतर दिवसात कोणाला मदत करण्यापेक्षा रमजानच्या महिन्यात जकात स्वरूपात दानधर्म करण्याला खूप महत्त्व असून, हे निश्‍चितपणे पाळतो आणि गरजूंना शक्‍य तेवढी मदत रमजानमध्ये स्वतः करत असतो. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून जकातचा उपयोग करण्याचा देखील प्रयत्न असेल. 
- शकील रझीज, शिक्षक, अँग्लो उर्दू हायस्कूल 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com