आमचा रमजान : गरजूंना मदतीसाठी तरुणाईचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

रमजानच्या महिन्यात ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ते आपल्या उत्पन्नातील अडीच टक्‍के "जकात' गरिबांना मदत म्हणून देतात. परंतु, जकात देणे शक्‍य नसले तरी शक्‍य होईल ती मदत देण्यासाठी कायम पुढे राहतो. पर्वातील हा आनंद खूप मोठा असल्याची भावना समाजातील तरुणांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केली. 

रमजान पर्वात दिवसभर रोजा करूनही त्रास किंवा थकवा जाणवत नाही. उलट एकप्रकारची उर्जा मिळते. "कुराण'मध्ये उल्लेख असल्याप्रमाणे आणि नियमांप्रमाणे महिनाभर सुरू असल्याने कोणतीही अडचण वाटत नाही. शिवाय, रमजानमध्ये गरिबांना जकात दिली जाते. मी जकात देऊ शकत नसलो, तरी गरिबांना शक्‍य तितकी मदत करतो. यातून मिळणारा आनंद माझ्यासाठी खूप मोठा असतो. 
- समीर शेख, युवक 
 
रमजानच्या महिन्यात "रोजा'ला सुरवात केल्यापासून त्याचे काटेकोरपणे पालन करतो. दिवसभर काही न खाता- पिता राहतो. पण, थोडे देखील काही वाटत नाही. आता रमजान पर्व सुरू झाल्यापासून पूर्णवेळ मशिदीत असतो. पाच वेळ नमाज पठण करतो. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असून, जकात देणे शक्‍य नाही. त्यामुळे जी मदत करता येईल ती करतो. 
- शेख समीर शेख इकबाल, विद्यार्थी. 

"रमजान' म्हणजे गरीब आणि वंचितांना मदतीचा हात देण्याचे पर्व आहे. शिवाय, संपूर्ण महिनाभर रोजा करून पहाटे चारला सैनी असते. गरिबांना किंवा रुग्णालयात हे करण्यास अडचणी असतात. त्यांच्यासाठी मदत म्हणून गरीब वस्ती आणि रुग्णालयात सैनीची सुविधा करतो. यात दूध आणि रोट देतो. तसेच गरिबांच्या वस्तीत दोनशे जणांना अन्नदान म्हणून पाच किलो गहू, तांदूळ, तेल, तूप वाटप करणार आहे. 
- इरफान नूरी, तरुण

Web Title: marathi news jalgaon ramjan youth