जळगावात "श्री रामनामा'चा जयघोष! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

जळगाव ः "जय राम श्रीराम जय जय राम'च्या जयघोषाने जळगावनगरी दुमदुमली. रामनवमीनिमित्त ग्रामदैवत असलेल्या श्रीराम मंदिर संस्थानात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शिवाय चिमुकले राममंदिरासह शहरातील राम मंदिरांमध्ये राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात झाला. प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी होती. 

श्रीराम मंदिर संस्थान व नवीन बसस्थानकाजवळील चिमुकल्या राममंदिरात रामनवमीनिमित्त कीर्तन, प्रवचन असे विविध कार्यक्रम झाले. यामुळे अवघी जळगावनगरी श्री रामचंद्रांच्या पावण नामजपात व मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीने दुमदुमून गेली होती. चिमुकले राममंदिरात पहाटेपासून रामनवमी जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाची सुरवात पहाटे साडेपाचला काकडारतीने झाली. सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत कीर्तन झाले. यानंतर दुपारी बाराला प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात झाला. यावेळी महिला भाविकांची विशेष गर्दी होती. 

भव्य शोभायात्रा 
सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे आज दुपारी प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. गोलाणी मार्केटजवळील दक्षिणमुखी हनुमान मंदिरापासून शोभायात्रेला सुरवात झाली. शोभायात्रेत विविध मंडळांसह संस्था- संघटना व रामभक्‍तांचा सहभाग होता. यात पारंपरिक वाद्य, नृत्य व आखाड्याचे साहसी क्रीडाप्रकार दाखविण्यात येत होते. शिवाय, प्रभू श्रीरामांची सजिव आरास देखील साकारण्यात आलेली होती. 

Web Title: marathi news jalgaon ramnavami