"राष्ट्रवादी'ने वाटली साखर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

जळगाव : सरकारने पाकिस्तानची साखर आयात केली असून, याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्यावतीने आज जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयासमोर साखर वाटप केली. विशेष म्हणजे भाजपचे आमदार सुरेश भोळे यांना देखील आंदोलनकर्त्यांनी साखर दिली. 

राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसतर्फे आज दुपारी बारावाजता आंदोलन करण्यात आले. जळगावात शिवतीर्थ मैदानासमोर राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोर सदर आंदोलन करण्यात आले. साखर वाटप करून केंद्र व राज्य सरकारने पाकिस्तानी साखर आयात केल्याचा निषेध करण्यात आला. रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना स्वदेशी साखरचे वाटप करताना पाकिस्तानी साखर घेवू नये असेही अवाहन करण्यात आले. राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या अध्यक्षा कल्पिता पाटील यांनी सांगितले, कि केंद्रातील सरकारने पाकिस्तानातून साखर आयात केली आहे. त्यामुळे भारतातील साखरेला भाव मिळणार नाही, पर्यायाने येथील शेतकऱ्यांच्या उसालाही भाव मिळणार नाही. कर्जबाजारी असलेला शेतकरी हतबल झाला आहे. त्यातच सरकारने हे आयात धोरण राबविल्याने येथील शेतकरी पूर्णपणे कोलमडणार आहे. त्याचा आम्ही निषेध करीत आहोत. सरकारने पाकिस्तानातून आयात केलेली साखर परत पाठवावी असे अवाहनही त्यानीं केले. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: marathi news jalgaon rashtravadi sugar