जळगावात फटाक्‍यांच्या आतषबाजीत रावण दहन! 

जळगावात फटाक्‍यांच्या आतषबाजीत रावण दहन! 

जळगाव ः दरवर्षीप्रमाणे यंदाही मेहरूण तलावावर विजयादशमीला 51 फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात आले. एल. के. फाउंडेशनच्यावतीने सायंकाळी साडेसातला झालेल्या या उत्सवात फटाक्‍यांच्या प्रचंड आतषबाजी करण्यात आली. 
मेहरूण तलावावर एल. के. फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी रावण दहन करण्यात येत असते. यंदा 51 फुट उंच रावणाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. सायंकाळी हा सोहळा पाहण्यासाठी जळगावकरांची प्रचंड गर्दी होती. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले. यावेळी आकाशात पंधरा- विस मिनिट रंगबिरंगी फटाक्‍यांची आतषबाजी सुरू होती. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल, महापौर सिमा भोळे, उपमहापौर अश्‍विन सोनवणे, माजी महापौर ललीत कोल्हे, आयुक्‍त चंद्रकांत डांगे आदी उपस्थित होते. सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर मंत्री महाजन यांच्या हस्ते रावण दहन करण्यात आले. सुमारे 15 मिनीट फटाक्‍यांची आतषबाजी सुरू होती. रावण दहन पाहण्यासाठी मेहरूण तलावावर नागरिकांची प्रचंड गर्दी होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com