लोकसभेचा रावेर मतदारसंघ -कॉंग्रेसच निवडणूक लढवेल अन्‌ जिंकेल ः भाई जगताप  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

जळगाव ः लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी जास्त जागा निवडून आणण्यासाठी संपूर्ण तयारी करीत आहे. त्यामुळे जिंकून येण्याची परिस्थिती असलेल्या ठिकाणांच्या जागांची अदलाबदल होण्याची शक्‍यता आहे. त्या अनुषंगाने लोकसभेची रावेरची जागा कॉंग्रेस लढवेल, अशी मागणी करून ती जिंकणारच, असा विश्‍वास कॉंग्रेसचे उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी भाई जगताप यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. 

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी निश्‍चित झाली आहे. दोन्ही पक्षांतर्फे जागावाटपही निश्‍चित करण्याची चर्चा सुरू आहे. त्यात सद्यःस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेल्या रावेरच्या जागेची कॉंग्रेसने मागणी केली आहे. त्याबाबत फैजपूर येथे झालेल्या जनसंघर्ष यात्रेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आमदार भाई जगताप यांच्यासह सर्वच नेत्यांनी रावेरची जागा कॉंग्रेसच लढवेल, असे जाहीर केले. मात्र, गेल्या काही दिवसांत दोन्ही पक्षांत जागावाटपाच्या चर्चेत कॉंग्रेसकडून रावेरच्या जागेबाबत मागणी होत नसल्याच्या वृत्तामुळे कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी आमदार भाई जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत "आघाडी'तर्फे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न असणार आहेत. त्यामुळे जागावाटपाच्या चर्चेत प्रत्येक जागेला जिंकून येण्याचेच निकष लावण्यात येत आहेत. जळगाव जिल्ह्यात जळगाव व रावेर या दोन्ही जागा "राष्ट्रवादी'कडे आहेत. रावेर मतदारसंघात दोन वेळा राष्ट्रवादी कॉंग्रेस पराभूत झालेली आहे. मात्र, या मतदारसंघात कॉंग्रेसचा चांगला जोर आहे. त्यामुळे या ठिकाणाहून कॉंग्रेसचा उमेदवार हमखास निवडून येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या अंतर्गत बैठकीतही ही जागा कॉंग्रेसकडे घेण्याचे निश्‍चित झाले. जागावाटप समितीनेही कॉंग्रेसलाच ही जागा द्यावी, असा प्रस्ताव दिला आहे. जागावाटपाबाबत दोन्ही पक्षांची अद्याप चर्चा सुरू आहे. त्यात काही जागांची अदलाबदल होणार आहे. त्यात निश्‍चितच रावेरची जागा कॉंग्रेसकडे घेण्यात येऊन ही जागा कॉंग्रेसच लढविणार आहे.

Web Title: marathi news jalgaon raver loksabha congress Bhai jagtap