रावेरमध्ये रक्षा खडसेंविरुद्ध डॉ. उल्हास पाटील लढत? 

रावेरमध्ये रक्षा खडसेंविरुद्ध डॉ. उल्हास पाटील लढत? 

जळगाव : रावेर मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे विद्यमान खासदार रक्षा खडसे यांची उमेदवारी निश्‍चित झाल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतही माजी खासदार उल्हास पाटील यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असल्याने दोन्ही उमेदवारांत टक्कर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 
रावेर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून हा मतदार संघ भाजपकडे आहे. शिवाय विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे लोकसभेतील कामगिरीही चांगली असल्यामुळे देशातील पक्षाच्या "अे वन' मतदारसंघात रावेरचे नाव आहे. या मतदारसंघातील उमेदवार न बदलण्याबाबत पक्षात निर्णय झाला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील विद्यमान खासदारांना उमेदवारांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. या शिवाय रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हिरवा कंदील दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपतर्फे रक्षा खडसे पुन्हा मैदानात असतील, हे निश्‍चित आहे. 
 
आघाडीकडून डॉ. पाटील 
रावेर आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ अदलाबदल करण्याबाबत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. रावेरमध्ये कॉंग्रेस इच्छुक असल्याने ही जागा कॉंग्रेसला सोडण्याची तयारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने दाखविल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र जागेत अदलाबदल न झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस ही जागा सोडणार नाही, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे नकार कळविल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तरीही आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून डॉ. उल्हास पाटील ही निवडणूक लढविण्याची शक्‍यता असून, त्याबाबत आता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरही ही चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सहमती दिल्यास आघाडीच्या माध्यमातून कॉंग्रेसचा उमेदवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी लढण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. याबाबत स्थानिक स्तरावरही विचारणा होण्याची शक्‍यता आहे. नगरमध्ये सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीबाबत असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याला यश आले नाही. रावेर मतदार संघात हे समीकरण होण्याची शक्‍यता आहे. त्यात जातीय समीकरणातही "आघाडी' सरस ठरत असल्याचा सर्वे प्राप्त झाला आहे. अंतिम निर्णय उद्या (ता. 17) होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे रावेर मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीतर्फे खासदार रक्षा खडसेंविरुद्ध कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील अशी लढत होण्याची शक्‍यता आहे. 
 
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या माध्यमातून संयुक्तपणे चर्चा करून या उमेदवारीबाबत वरिष्ठस्तरावर निर्णय झाल्यास दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जोमाने कार्य करतील. "आघाडी'च्या उमेदवाराला निश्‍चित यश मिळेल, याची खात्री आहे. 
- डॉ. उल्हास पाटील माजी खासदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com