Loksabha 2019 : रावेर लोकसभा मतदारसंघ : खडसेंच्या वलयाने भाजपचे अबाधित वर्चस्व 

Loksabha 2019 : रावेर लोकसभा मतदारसंघ : खडसेंच्या वलयाने भाजपचे अबाधित वर्चस्व 

खानदेशात भाजपची पायाभरणी करणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्‍यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपंचायतीमध्ये पुन्हा सिद्ध झाले आहे. खानदेशात भाजपची वाटचाल तळागाळापर्यंत रुजविताना माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसेंनी मतदारसंघावरील पकड तीन दशकांपासून आजतागायत कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेनेही खडसेंच्या या बुरुजात आपले पाय रोवत वेळोवेळी अस्तित्व सिद्धही केले आहे. 

भाजपचा प्रगतीच्या या "माईल स्टोन'ला राजकीय ग्रहण लागले असताना त्यांची जमिनीवरील पकड अधिकच घट्ट झाल्याचे चित्र या निवडणुकांमधून उमटून आले आहे. तालुक्‍यात भाजपच्या गडाला सुरुंग लावण्यास विरोधक अपयशी ठरले असून आमदार खडसे मंत्री असो या नसो मतदार संघातील जनता त्यांचा पाठीशी असल्याचे सिद्ध होते. 
तालुक्‍यात भाजपने अभूतपूर्व यश संपादन करीत पंचायत समिती व जिल्हा परिषदेत, नगरपंचायत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. पंचायत समितीच्या एकूण आठ जागांपैकी सहा जागा भाजपच्या ताब्यात गेल्याने भाजपचे अभूतपूर्व यश संपादन झाले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक व शिवसेनेचा एक असे दोन विरोधी उमेदवार फक्त पंचायत समितीला निवडून आले आहेत. जिल्हा परिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने चारही जागांवर विजय मिळवीत राष्ट्रवादी व सेनेच्या ताब्यातील प्रत्येकी एक, एक गट काबीज केला आहे. तर नगरपंचायतीच्या 17 जागांपैकी फक्त तीन प्रभागात शिवसेना व 14 प्रभागात भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले तर राष्ट्रवादी व कॉंग्रेस आपले अस्तित्व शून्य केले. त्यामुळे पक्षाने खच्चीकरण केल्यानंतरही खडसेंनी त्यांची शक्ती पणाला लावीत तसेच खासदार रक्षा खडसेंच्या विकासकामांच्या जोरावर आणि दांडग्या जनसंपर्काचे व नियोजनबद्ध प्रचाराचे फलित म्हणून भाजपने जिल्ह्यात मिळवलेल्या अभूतपूर्व यशात रावेर लोकसभा मतदारसंघाचा वरचष्मा राहिला आहे. तसेच शिवसेनेला गेल्यावेळी विधानसभेत मिळालेली मते याचा अतिआत्मविश्वास व शिवसेनेला गेलेली मते यामुळे राष्ट्रवादीचे खच्चीकरण तर होत नाही या शंकेत असलेल्या राष्ट्रवादीने पुन्हा जम बसवू नये याच वृत्तीत असलेली सेना त्यामुळे अस्तित्वाच्या द्वंद्वातून उमेदवाऱ्या सेना व राष्ट्रवादी ने दिलेल्या दिसून येत होत्या. एरवी सेना व राष्ट्रवादीने एकमेकांचा लंगोट पकडूनच खडसेंचा बुरूज हलविलेला पाहिला आहे. परंतु दोघा पक्षांच्या आत्मविश्वासाला जनतेने वठणीवर असल्याचे चित्र या निवडणुकीत पहायला मिळाले. 
आमदार खडसे यांच्या नेतृत्वाखाली गत अनेक वर्षात या तालुक्‍यात पंचायत समितीवर, नगरपंचायतीवर सत्ता आहे. अपवाद राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सभापती शिला घाडगे वगळता यंदाच्या निवडणुकीत उचंदा गणातील सभापती पदासाठी अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवरसुद्धा भाजपच्याच शुभांगी भोलाणे यांनी बाजी मारल्याने राष्ट्रवादीने शक्ती पणाला लावूनही ही जागा भाजपने काबीज केली. त्यामुळे राष्ट्रवादीचे सभापती पदाचे स्वप्न भंगले. पंचायत समितीत एक एक जागेवर सेना व राष्ट्रवादीला यश आले असले तरी मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व सेनेला सपशेल अपयश आले असून भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. असे असले तरी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांचाही मतदारसंघावर बऱ्यापैकी प्रभाव आहे. 
 
युतीबाबत संभ्रम 
गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी युती तोडल्याचा राग म्हणून रक्षा खडसे यांना रावेर मतदारसंघात शिवसेनेकडून दगाफटका होण्याची भीती खडसे यांनी वाटत असून, युती धर्माचे पालन न झाल्यास त्याचे अन्य ठिकाणी पडसाद उमटतील, असा इशारा त्यांनी दिला आहे. तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून युती तोडण्यास कारणीभूत असलेल्या खडसेंच्या परिवारातील उमेदवार असल्यास युती धर्म न पाळता विरोधात काम करणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर टाकून जाहीर विरोध दर्शविला जात आहे. 
 
मतदारसंघातील प्रश्‍न 
- रखडलेल्या उपसा सिंचन योजना 
- सध्याची भीषण पाणीटंचाई 
- उद्योग क्षेत्राच्या विकासाची प्रतीक्षा 
- वनक्षेत्रास अभयारण्याच्या दर्जाची प्रतीक्षा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com