दानवेंनी वापरलेला शब्द मंत्री पाटलांनीही घेतला...पण कशासाठी 

gulabrao patil ravsaheb danve
gulabrao patil ravsaheb danve

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भडगाव येथे झालेल्या कार्यक्रमात विरोधकांवर टीका करताना वक्तव्य केले. विधानसभा निवडणुकीतील बंडखोरीच्या मुद्यावरुन भाजपच्या नेत्यांवर आगपाखड करताना आक्रमक पवित्रा घेतला. "सालेहो सेटींग करतात, तेही आमचीच मते खाऊन. भोगावे लागले इथेच' असे वक्तव्य त्यांनी केले. दानवेंनी वापरलेला हा शब्द मंत्री पाटलांनी विरोधक म्हणजेच भाजपवरच निशाणा साधण्यासाठी वापरला. 


भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत वापरलेला शब्द पालकमंत्री गुलाबराव पाटल यांनी विरोधकांवर टीका करताना वापरला. भडगाव इथे झालेल्या एका राजकीय कार्यक्रमादरम्यान त्यांनी तो वापरला. 
युतीच्या मुद्द्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, की लोकसभा निवडणुकीवेळी आमची भाजपसोबत युती होती. भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्यासाठी आम्ही अंग झटकून मेहनत केली. रात्रीचा दिवस केला. त्यांचा चहाही प्यायलो नाही. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने युती धर्माचे पालन केले नाही. आमच्या वाट्याला असलेल्या मतदारसंघात बंडखोर पेरले असे सांगत "सालेहो सेटींग करता, तेही आमचीच मते खाऊन. सेटींग करायची असती तर मी लोकसभा निवडणुकीत केली असती. माझ्या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर उमेदवार होते. त्यांना मी सांगितले असते तुम्ही लोकसभा लढा, मी विधानसभा लढतो. पण मी युती धर्माचे पालन केले. गद्दारी आमच्या रक्तात नसल्याचेही ते म्हणाले. 

कसेही असो आता आम्ही सत्तेत 
राज्यातील सध्याचे विरोधक म्हणत आहेत की महाविकास आघाडीचे सरकार फार काळ टिकणार नाही. कसेही असो आम्ही आता सत्तेत आहोत. आमचा मुख्यमंत्री आहे, असा चिमटादेखील गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या नेत्यांना काढला. 

त्यांच्या पायाही पडू आणि गच्चीही पकडू 
आमदार नव्हतो तरीही आपण आमदारासारखंच होतो. आमची ताकद आहे गच्ची पकडून काम करुन घ्यायची, हात जोडून काम करुन घ्यायचे आणि पाया पडून काम करुन घ्यायचे. या तिन्ही स्टाईल आमच्याकडे आहेत. चांगला अधिकारी असेल तर पाया पडून काम करुन घेऊ. देवासारखा असेल तर नमस्कार करु, जर आगाऊ अधिकारी असेल तर गच्चीही पकडू, तिन्ही स्टाईल आहेत, असेही गुलाबराव पाटील म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com