तांदळाची आवक वीस टक्‍क्‍यांनी घटली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

जळगाव ः खानदेशात तांदूळ मोठ्या प्रमाणात पिकत नसला तरी त्याची विक्री मात्र चांगल्या प्रकारे होते. धान्य आणि कडधान्यासाठी सर्वदूर ख्याती असलेल्या व कोट्यवधींची उलाढाल होत असणाऱ्या शहरातील दाणाबाजारात सध्या तांदळाची विक्री सुरू आहे. मात्र यंदा तांदळाचे उत्पादन मागील वर्षीपेक्षा कमी झाल्याने वीस टक्‍क्‍यांनी आवक घटली आहे. परिणामी, भावात 15 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 
सध्या विविध प्रकारच्या तांदळाची शहरात आवक सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत भावही काहीसे जास्त आहे. वर्षभराच्या साठवणुकीच्या दृष्टीने नव्या तांदळाच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. 

वर्षाचे धान्य आगाऊ खरेदी करण्याची परंपरा खानदेशात आहे. एप्रिल महिन्यापासून नव्या गव्हाचा व तांदळाचा हंगाम सुरू झाला असून, बाजारात झुंबड उडत आहे. यात चिनोर, कालीमूछ, कोलम याला सर्वाधिक पसंती मिळत आहे. 

इतर राज्यातून आयात 
बाजारात बासमतीसह कोलम, चिनोर, कालीमूछ, परिमल, मसुरी, आंबेमोर यांसारख्या बऱ्याच प्रकारच्या तांदळाची आवक सुरू आहे. विदर्भातील गोंदिया, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, छत्तीसगड, दिल्ली, हरियाना तसेच लगतच्या राज्यातून शहरातील घाऊक दाणाबाजारात दररोज 10 ते 15 टन ट्रक भरून तांदळाची आवक होत आहे. 

असे आहेत तांदळाचे दर...... 
तांदळाचा प्रकार, दर प्रति क्विंटल 
चिनोर - 3300 ते 3500 
कालीमूछ - 4000 ते 4200 
मसुरी - 2700 ते 2800 
परिमल - 2700 ते 2800 
आंबेमोर - 5600 ते 5800 
बासमती (रेग्युलर) -4000 ते 5000 
बासमती (दर्जेदार) - 5500 ते 7000 
कोलम - 5000 ते 5400 

यंदा तांदळाचे उत्पादन कमी झाले आहे. बाहेरच्या राज्यातून तांदूळ शहरात येत असल्याने त्याच्या दरात देखील 15 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. यात चिनोर व कोलमला सर्वाधिक मागणी आहे. 
ललित शेठ (व्यापारी)

Web Title: marathi news jalgaon rice 20 parcent