रिचार्जची रक्‍कम अदा; स्मार्ट फोनची प्रतीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

जळगाव : अंगणवाडी सेविकांना अंगणवाडीतील सर्व कामाचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी स्मार्टफोन देण्यात येणार आहेत. यामुळे काम सोपे होणार आहे. परंतु, जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठीचे स्मार्टफोन अद्याप प्राप्त झालेले नाही. उलट फोन मिळण्यापूर्वीच त्यासाठी लागणाऱ्या नेट रिचार्जचे दोन महिन्यांसाठीची रक्‍कम अदा करण्यात आली आहे. 

राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्याची घोषणा गेल्या महिन्यात करण्यात आली होती. आठवडाभरात स्मार्टफोन अंगणवाडी सेविकांना मिळतील असे सांगण्यात आले होते. परंतु, अद्यापपर्यंत फोनची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील अडीच हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्टफोन देण्यात येणार आहे. त्याद्वारे सर्व माहिती आणि दैनंदिन अहवाल ऑनलाइन भरण्याचे काम सेविकांना करावे लागणार आहे. यामुळे गरोदर माता आणि बालकांचे लसीकरण याची माहिती तत्काळ जिल्हा मुख्यालयाला मिळू शकणार आहे. पण मागणी करून देखील हे स्मार्टफोन आयुक्त कार्यालयाकडून आलेले नाही. 
जिल्ह्यात जवळपास दोन हजार 440 अंगणवाडी आहेत. अनेक अंगणवाडी या दुर्गम भागात भरत असतात. काही ठिकाणी इमारत नसल्यामुळे कुडाच्या घरात किंवा अंगणवाडी सेविकेच्या अंगणात अथवा ग्रामपंचायत कार्यालयात त्या भरवाव्या लागतात. यामुळे मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत असते. यामुळे पूरक पोषण आहार, औषधी वाटप, बालकांचे वेळोवेळी वजन घेणे यासह इतर बाबींना अंगणवाडी सेविकांना सामोरे जावे लागते. यात रेकॉर्ड कुठे ठेवायचा हा प्रश्‍न निर्माण होत असतो. स्मार्ट फोनने हे काम हलके होणार असून, फोन कधी येतील याकडे लक्ष आहे. 
 
Web Title: marathi news jalgaon richarge smartphone anganwadi sevika