निवृत्त पोलिसाचा पत्नीसह आत्मदहनाचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

जळगाव : फैजपूर येथील निवृत्त सहाय्यक फौजदार शेख शकील शेख दगू यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पत्नीसह येऊन आत्मदहनाचा इशारा दिला. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करून रोखले. काही महिन्यांपूर्वी याच प्रकरणात शेख दाम्पत्याने अशाच पद्धतीने आत्मदहन करण्याबाबत जिल्हापेठ पोलिसांना पत्र दिले होते आणि पोलिसांनी त्यांना रोखले होते. आज पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात तशाच पद्धतीने गोंधळ उडाला. 

घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, शेख शकील शेख दगू यांनी एका निवेदनाद्वारे दिलेल्या तक्रारीनुसार म्हटले आहे, की निवृत्त झाल्यानंतर आपण समाजसेवेसाठी शिवसेनेत प्रवेश करून सामाजिक कार्य सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी यातूनच काही गावगुंडांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला केला होता. पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल असताना संशयितांना अटक न करता पोलिसांकडून व्हीआयपी वागणूक दिली जाते, संशयिताच्या अटकेची मागणी केल्याने डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी संशयितांशी हातमिळवणी करुन आपल्यासह कुटुंबीयांवर खोटे गुन्हे दाखल केले. याबाबत वारंवार तक्रारी करूनही डीवायएसपी नरेंद्र पिंगळे आणि उपनिरीक्षक जिजाबराव पाटील यांच्यावर कारवाई झाली नाही. उलट दोघांकडून आपणास मानसिक छळ करण्यात येत आहे. खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून जेलमध्ये टाकण्याची भाषा दोघांकडून केली जाते. या सर्व त्रासाला कंटाळून शेख दाम्पत्याने जिल्हाधिकारी कार्यालय गाठत आत्मदहनाचा इशारा दिला. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी भेट घेतल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: लक्ष घालून या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन रद्द करीत असल्याचे शकील शेख यांनी नमूद केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अकबर पटेल, कर्मचारी प्रशांत जाधव, अजित पाटील, हेमंत पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वेळीच जिल्हाधिकारी कार्यालय गाठून शेख दाम्पत्याला रोखले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ritaired police and wife sucide triy