खड्डेमुक्ती गेली खड्ड्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

जळगाव : गेल्या डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र खड्डेमुक्त करण्याच्या बांधकाममंत्री चंद्रकांत पाटलांच्या घोषणेच्या सहा महिन्यानंतरही ते स्वतः पालक असलेल्या जळगाव जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था "खड्डेमुक्ती गेली खड्ड्यात' असेच दर्शविणारी आहे. बांधकाम खात्याच्या अखत्यारितील चार हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांपैकी तब्बल बाराशे किलोमीटरचे रस्ते खराब व अतिखराब अवस्थेत असून, केवळ 900 किलोमीटर लांबीचे रस्तेच ठीकठाक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राज्य व प्रमुख जिल्हामार्ग अशा 1544 मार्गांच्या दुरुस्तीचे काम बांधकाम विभागाकडून सुरू आहे. 

गेल्यावर्षी राज्यभरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष्य होत असताना बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डिसेंबरपर्यंत संपूर्ण राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यात येतील, अशी घोषणा केली होती. या घोषणेला सहा महिने उलटून गेल्यानंतरही राज्यभरातील रस्त्यांची अवस्था चांगली झालेली नाही. जिल्ह्यात बांधकाम विभागाच्या अखत्यारित राज्यमार्ग व प्रमुख जिल्हामार्ग असे मिळून 4100 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. उर्वरित जिल्हा ग्रामीण व ग्रामीण मार्ग, तसेच पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्ते जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येतात. 

रस्त्यांच्या तीन अवस्था 
राज्य शासनाच्या बांधकाम विभागांतर्गत रस्त्यांपैकी सद्यःस्थितीत केवळ 931 किलोमीटर लांबीचे रस्ते चांगल्या अवस्थेत आहेत; तर 94 किलोमीटर रस्ते सरासरी या वर्गात मोडतात. असे एकूण 1025 किलोमीटरचे रस्तेच ठीकठाक आहेत. उर्वरित 717 किलोमीटरचे रस्ते खराब आणि 547 किलोमीटर लांबीचे रस्ते अत्यंत खराब अवस्थेत आहेत. अर्थात, गेल्या दोन-तीन महिन्यांत यातील काही रस्त्यांची दुरुस्ती झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर जिल्ह्यात आजमितीस जवळपास 1544 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर दुरुस्ती, डागडुजीची कामे सुरू आहेत. 

पाचशे कोटींची मागणी 
जिल्ह्यात 717 किलोमीटरच्या खराब रस्त्यांसाठी 257 कोटी तर 547 कि.मी. लांबीच्या अतिखराब रस्त्यांसाठी 225 कोटींची मागणी बांधकाम विभागाने शासनाकडे केली आहे; तर 94 किलोमीटरच्या सरासरी वर्गातील रस्त्यांसाठी 13 कोटी 30 लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे. 
 
रस्ते दृष्टिक्षेपात... 
(किलोमीटरमध्ये) 

एकूण रस्ते : 4100 
चांगले रस्ते : 931 
काम सुरू : 1544 
सरासरी बरे : 94 
खराब रस्ते : 717 
अत्यंत खराब : 547

Web Title: marathi news jalgaon road