'करंट्यांपासून मला वाचवा, मी ग. स. बोलतेय' 

'करंट्यांपासून मला वाचवा, मी ग. स. बोलतेय' 

चोपडा ः आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव ग. स. सोसायटीतील फुटीरवाद्यांविरूद्ध 'करंट्यांपासून मला वाचवा, मी ग. स. बोलतेय' अशा आशयाचे प्रसिद्धी पत्रक जिल्हा प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व सरचिटणीस योगेश सनेर यांनी काढले आहे. या टिकात्मक प्रसिद्धीपत्रकाची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

पत्रकात म्हटले आहे, की जळगाव ग. स. सोसायटीच्या संचालक मंडळाची मुदत पुढील वर्षी संपत आहे. शेवटच्या सत्रात पद व पैशांचा प्रतिष्ठेसाठी एक हाती सत्ता दिलेल्या सहकार गटाने त्यांच्यातीलच दलबदलू मंडळींनी स्वतंत्र चूल मांडून फुट पाडून वेगळा गट स्थापन केला. सत्ता, पैसा, पदासाठी कोणत्याही गटावर निष्ठा नसताना परत निष्ठावान व मात्तबरांना एकत्र सोबत घेऊन आगामी निवडणूक लढण्याचे मनसुबे बाळगत आहेत. आगामी काळात या आयाराम गयारामांना सभासद त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. लोकमान्य, प्रगती व सहकार गटाशीही गद्दारी करणाऱ्यांना सभासद कधीही माफ करणार नाहीत. तसेच सर्व आमदार खासदार, मंत्री यांच्या नावाचा गैरवापर करून सभासदांमध्ये प्रतिष्ठा निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न ही मंडळी करीत असते. आगामी काळात कोणावरही निष्ठा नसणाऱ्या या मंडळीचे पापाचे गाठोडे आमच्याकडे उपलब्ध आहेत. 

(कै.) ह. मा. पवारांचे निष्ठावंत कोण ? पुढील वर्षी म्हणजे २०२० मध्ये जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी ग. स. सोसायटी जळगाव या संस्थेची सार्वत्रिक निवडणूक चुरशीची होणार आहे. यात लोकमान्य व प्रगती गटातील निष्ठावंतांना सोबत घेवून लढण्याचा मनोदय सहकार गटातील फुटीर गटाने व्यक्त केला आहे. लोकमान्य गटाची सत्ता २००८-०९मध्ये असताना प्रगती गटाचे एक संचालक सहभागी होते. यात लोकमान्य गटाची एकहाती सत्ता असताना १७ संचालकांना सभासदांनी निवडून दिलेले होते. मात्र, सत्ता, पद, पैशांच्या हव्यासपोटी १४ संचालक लोकमान्य गटातून बाहेर पडले. कोणताही गट अशा फुटीर गद्दांरांना उमेदवारी देत नव्हते. यावेळी प्रगती गटाकडे उमेदवारीची याचना करीत उमेदवारी मिळवत ऐनवेळी सहकार गटात दाखल झाले. सुरवातीपासूनच गद्दारी करणाऱ्यांना सहकार गटाने उमेदवारी दिल्या व २०१५ च्या निवडणुकीत तिकीटे देवून सत्तेचा गैरवापर करून सर्व संचालकांना निवडून आणले. चार वर्षात सर्वांनी सत्तेची फळे चाखली. ५४ पदांची नोकरभरतीचा प्रस्ताव सादर करणाऱ्या संचालकांनी एकत्र येवून बेकायदेशीर ६३ पदांची नोकरभरती केली. त्यात बायका पोरांसह नातेवाईकांना संधी दिली. सहकार गटाशीही गद्दारी करणाऱ्यांना सभासद कधीही माफ करणार नाहीत असेही यात म्हटले आहे. प्रसिद्धी पत्रकावर जिल्हा प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील व सरचिटणीस योगेश सनेर यांची स्वाक्षरी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com