esakal | केंद्राकडून ज्वारी व मका खरेदिस मंजुरी, 'सकाळ'च्या पाठपुराव्याला यश
sakal

बोलून बातमी शोधा

sakal impact

केंद्र सरकारने ज्वारी व मका खरेदिस मान्यता दिली आहे. लवकरच अन्न, नागरी व पुरवठा विभागाकडुन खरेदिबाबत आदेश निघतील. 
- दादा भुसे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य

केंद्राकडून ज्वारी व मका खरेदिस मंजुरी, 'सकाळ'च्या पाठपुराव्याला यश

sakal_logo
By
सुधाकर पाटील

भडगाव : ज्वारी व मका खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत 'सकाळ' गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू ठेवलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. केंद्राने ज्वारी व मका खेरेदि करण्यास हीरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे लवकरच राज्य शासनाकडून राज्यात हमीभाव केंद्र सुरू करण्यात येतील. खरेदि केंद्र सुरू होणार असल्याने राज्यातील ज्वारी व मका उत्पादक शेतकर्याना खासगी व्यापार्यापेक्षा क्विटंलमागे 700-900 रूपये जास्तीचा भाव मिळणार आहे. 'सकाळ' च्या जागल्याच्या भूमिकेचे शेतकर्यानी कौतुक केले आहे. 
शासनाकडून तुर व हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र रब्बी त मोठ्याप्रणात पिकलेल्या ज्वारी , मकाचे खरेदि केंद्र शासनाकडुन करण्यात आले नव्हते. त्यामुळे शेतकर्याना व्यापार्याकुडून ज्वारीला हमीभावापेक्षा क्लिटंलमागे 800-900 रूपये तर मक्यात 600-800 रूपये कमी भाव मिळत आहे. यामुळे एकट्या जळगाव जिल्ह्यातील शेतकर्याना 400 कोटीचा फटका बसण्याची शक्यता होती. या अनुषंगाने 'सकाळ' शेतकर्याचा आवाज बनून गेल्या 15 दिवसापासून सातत्याने ज्वारी व मका हमीभाव केंद्र सुरू करण्याबाबत भुमिका लावून धरली होती.

केंद्राची ज्वारी व मका खरेदीस मंजुरी
शासानाने तुर व हरभरा खरेदी केंद्र सुरू केले. मात्र ज्वारी व मका खरेदि केंद्र सुरू करण्यात आले नसल्याने शेतरकर्याना मोठा फटका बसत होता. त्यामुळे शासनाने ज्वारी व मका खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी शेतकर्याकडुन करण्यात येत होती. राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा चालवला होता. अखेर आज केंद्राने ज्वारी व मका खरेदि केंद्र सुरू सुरू करण्यास हीरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे ज्वारी व मका उत्पादक शेतकर्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. केंद्राने खरेदिस मान्यता दिल्या ने शेतकर्याना मोठा दिलासा मिळाला आहे.

लवकर खरेदि केंद्र सुरू होणार
केंद्र शासनाने ज्वारी व मका खरेदि करण्यास मान्यता दिल्याने आता राज्य शासनाकडून लवकरच राज्यात खरेदि सुरू होऊ शकते. राज्य शासनाचा अन्न , नागरी व पुरवठा विभागामार्फत ही खरेदि करण्यात येते. त्यामुळे त्यांच्याकडुन ज्वारी व मका खरेदिचे हमीभाव केंद्र सुरू करण्याबाबत आदेश काढण्यात येतील. त्यानंतर मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून तालुकास्तरावर खरेदि केंद्र सुरू होतील. 25 हजार मॅट्रीक टन मका तर 15 हजार मॅट्रीक टन ज्वारी खरेदि करण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे. मात्र आता शासानाने वेळ न घालवता तत्काळ खरेदि केंद्र सुरू करावेत अशी अपेक्षा शेतकर्याकडुन व्यक्त होत आहे.
 
'सकाळ'च्या पाठपुराव्याला यश
ज्वारीचा हमीभाव हा 2 हजार 550 तर मक्याचे 1 हजार 760 रूपये असतांना व्यापार्याकडुन मका 800-1000 रूपये, ज्वारी 1500-1700 रूपये खरेदि केली जात होती. त्यामुळे लाॅकडाऊन अगोदरच अडचणीत आलेला शेतकरी हमीभाव केंद्र सुरू नसल्याने नाडला जात होता. हीच भुमिका 'सकाळ' ने गेल्या 15 दिवसापासून लावून धरली. लोकप्रतीनीधी, शेतकरी नेत्यांना या विषयावर जागते केले. तर कृषी मंत्री दादा भुसे यांनीही शासनाकडे सातत्याने हा प्रश्न लावून धरला. त्यामुळे अखेर केंद्र शासनाने ज्वारी व मका खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच राज्य शासनाकडून ही खरेदि केंद्र सुरू होऊ शकतात.
 

'सकाळ' ने ज्वारी व मका खरेदि केंद्र सुरू करण्याबाबत सातत्याने प्रश्न लावून धरला. त्यांचे मनापासून अभिनंदन. तर राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनीही याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे केंद्राने खरेदिस मान्यता दिली आहे. आता ही केंद्र तातडीने सुरू होण्याबाबत आपण पाठपुरावा करू.
- कीशोर पाटील आमदार पाचोरा-भडगाव 

केंद्राने शेतकर्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी मका व ज्वारी खरेदी करण्यास करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकर्याना मोठा दिलासा मिळाला आहे. तर 'सकाळ' ने हा प्रश्न सातत्याने लावून धरला. 
- उन्मेष पाटील खासदार जळगाव

'सकाळ'ने खर्या अर्थाने जागल्याची भुमिका निभावत ज्वारी व मका खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत पाठपुरवा केला. त्यामुळेच आज केद्रांचे ज्वारी , मका खरेदिस मान्यता दिली आहे. 'सकाळ' चे मनापासून धन्यवाद.
-हरीष भोसले शेतकरी आमडदे (ता.भडगाव)