"नॉनस्टॉप 22 तास...'ला लागला मुक्‍काम! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

जळगाव ः "एसटी'तील सुरक्षित प्रवास धोक्‍यात टाकून जळगाव- पुणे मार्गावर सकाळी जाणारी बस पुण्याहून संध्याकाळी जळगावकडे मार्गस्थ केली जात होती. यामुळे चालकाची ड्यूटी नॉनस्टॉप 22 तास व्हायची. याबाबत "सकाळ'मधून वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महामंडळाच्या मुंबई मुख्य कार्यालयाकडून चौकशी करून या प्रकाराबाबत माहिती मागविली आहे. मुख्य म्हणजे "नॉनस्टॉप 22 तास...'ला विराम देवून बसला मुक्‍काम करण्याचे आदेश आगारस्तरावरून काढण्यात आले आहेत. 

महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने जादा बसचे शेड्यूल्ड सुरू करण्यात येत असते. परंतु हा अघोरी प्रयोग जळगाव- पुणे या लांबपल्ल्याच्या मार्गावर महामंडळाच्या नियमात नसताना देखील सुरू होता. या प्रकरणाला "सकाळ'ने "प्रवाशांच्या छळासाठी' म्हणून "चालकाची ड्यूटी नॉनस्टॉप 22 तास...' या मथळ्याखाली चार दिवस मालिका चालवून वाचा फोडली. यानंतर संपूर्ण महामंडळ प्रशासन हादरले असून, मुंबई येथील महामंडळाच्या "जीएमटी' कार्यालयाकडून विभागीय कार्यालयाला या प्रकरणाबाबत चौकशी करण्यात आली. तसेच संपूर्ण शेड्युल्डची माहिती मागविली आहे. यामुळे स्थानिक विभागीय व आगार कार्यालय कामाला लागले आहे. 

दोन दिवस केवळ बैठका 
जळगाव- पुणे मार्गावर पहाटे पाचला जळगावहून सुटणारी बस पुण्याला पोहचल्यावर केवळ एक तास थांबून सायंकाळी पाचला जळगावकडे मार्गस्थ केली जात होती. या प्रकरणी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर मुंबई कार्यालयाकडून जळगाव विभागीय कार्यालयाकडे चौकशी करून प्रकरणाची पूर्ण रेकॉर्ड मागविले आहे. यानंतर जळगाव आगार स्तरावर 27 व 28 जून असे दोन दिवस केवळ बैठका घेण्यात आल्या. या बैठका घेऊन शेड्युल्डची माहिती जमवा- जमवा करण्याचे काम सुरू होते. 

पुण्याला मुक्‍काम सक्‍तीचा 
जळगाव आगारातून पहाटे पाचला पुण्यासाठी शेड्यूल्ड बस सोडण्यात येत होती. परंतु कधी पुण्याला मुक्‍कामी न थांबता त्याच दिवशी परत मार्गस्थ होण्याबाबत तोंडी आदेश, तर कधी चालक- वाहकांच्या मनमानीमुळे बस परत आणली जात होती. यात चालक 22 तास स्टेअरींगवर बसून प्रवाशांचा जीव धोक्‍यात टाकून बस परत आणत होता. मात्र आता हा प्रकार बंद करण्यात आला असून, जळगावहून पहाटे पाचला सुटणारी बस पुणे येथे मुक्‍कामी थांबविण्याची सक्‍ती करण्यात आली आहे. ही बस दुसऱ्या दिवशी दुपारी दोनला पुणे येथे मार्गस्थ करण्याच्या सूचना आगारस्तरावरून देण्यात आल्या आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon sakal impact parivahan bus