"सकाळ' खानदेश आवृत्ती वर्धापनदिन आज नगरसेवकांचा गौरव 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

जळगाव : "सकाळ' खानदेश आवृत्तीचा 14 वा वर्धापनदिन सोहळा उद्या (11 ऑगस्ट) साजरा होत असून, त्यानिमित्त महापालिकेतील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे. 
वर्धापन दिनाचे औचित्य साधून उद्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरव करण्यात येईल. 

विश्‍वासार्हता, सामाजिक बांधिलकी आणि त्यातून खानदेशवासीयांच्या पसंतीस उतरलेल्या या वाटचालीतील 15 व्या वर्षात "सकाळ'चे पदार्पण होत आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांचा सुवर्णयोगही यंदा चालून आला असून, त्यानिमित्त उद्या सरदार पटेल लेवा भवनात दुपारी साडेतीनला नगरसेवकांचा सत्कार करण्यात येईल. 
कार्यक्रमाला खासदार ए. टी. पाटील, श्रीमती रक्षा खडसे, आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, स्मिता वाघ, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, "बेटी बचाओ' अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, प्रथितयश हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुभाष चौधरी आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सोहळ्यात 75 नवनिर्वाचित नगरसेवकांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येईल. सर्व नगरसेवकांनी या सोहळ्यास आवर्जून यावे, तसेच राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही या अनोख्या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन "सकाळ माध्यम समूहा'तर्फे करण्यात आले आहे. 

पानसुपारीचा कार्यक्रम 
सत्कार सोहळ्यानंतर सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत "सकाळ'चे सर्व वाचक, हितचिंतक आणि मित्रपरिवारासाठी पानसुपारीचा स्नेहसोहळा याच ठिकाणी होईल. सर्वांनी यावेळी उपस्थित राहून "सकाळ'च्या यशस्वी वाटचालीचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: marathi news jalgaon sakal khandesh edition vardhapan