पूरग्रस्तांसाठी कळमसरेकरांचा 'सकाळ रिलीफ फंडा'कडे दहा हजारांचा निधी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

अमळनेर ः 'सकाळ रिलीफ फंडा'च्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांसाठी कळमसरे (ता. अमळनेर) येथील तरुणांनी दहा हजार रुपयांचा मदतनिधी देऊन सामाजिक बांधीलकी जोपासली आहे. 'सकाळ'च्या अमळनेर विभागीय कार्यालयात आज दुपारी दोनला त्यांनी हा निधी सुपूर्द केला. 

कळमसरे येथे शिव जयंती उत्सव समितीतर्फे 'मी कळमसरेकर' ही मोहीम राबविण्यात येत आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी एक मदतीचा हात म्हणून आपण मदत करावी, असे आवाहन त्यांनी परिसरातील ग्रामस्थांना केले. या माध्यमातून आज सकाळी दहापर्यंत सुमारे दहा हजार रुपये निधी संकलित झाला. हा मदतनिधी सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून पूरग्रस्तांना ते देत आहेत. या पार्श्वभूमीवर सकाळच्या येथील विभागीय कार्यालयाचे उपसंपादक योगेश महाजन, बातमीदार उमेश काटे, प्रा. हिरालाल पाटील यांच्याकडे त्यांनी हा निधी सुपूर्द केला आहे. यावेळी शिव जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक राजपूत, उपाध्यक्ष घनश्‍याम अग्रवाल, हर्शल राजपूत, पवन सूर्यवंशी, नीलेश चौधरी, जितेश परदेशी, समाधान चौधरी, देविदास माळी, विनोद गुरव, कमलेश महाजन, उमेश चौधरी, राकेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon sakal relief fund kadamsra 10 thousand