"सकाळ'तर्फे आज रंगणार "शाम-ए- यंगिस्तान' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

जळगाव : "सकाळ' खानदेश आवृत्तीच्या पंधराव्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी (ता. 10) "सकाळ' व महावीर क्‍लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने "शाम-ए-यंगिस्तान' या मराठी- हिंदी गीतांच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या बहारदार कार्यक्रमाच्या माध्यमातून जळगावातील तरुणाईच्या अनोख्या आविष्काराची मेजवानी जळगावकर रसिकांनी मिळणार आहे. 

"सकाळ' खानदेश आवृत्तीचा 15 वा वर्धापनदिन येत्या रविवारी (ता.11) साजरा होत आहे. त्यानिमित्त स्थानिक तरुणांच्या सुमधुर कलाविष्काराचा "शाम-ए-यंगिस्तान' हा बहारदार कार्यक्रम शनिवारी सायंकाळी सहाला आयोजित केला आहे. ही मराठी-हिंदी गीतांची मैफल कांताई सभागृहात होईल. मैफल सर्वांसाठी खुली असून, जळगावकर रसिकांनी या मैफलीचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन "सकाळ'तर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास "ओकिनिवा'चे वितरक केएमसी जागृती मोटर्सचे सहकार्य लाभले आहे. 
 
नवकलावंतांचा साज 
या सुमधुर गीतांच्या मैफलीस आवाजाचा साज चढविणार आहेत जळगावातील स्थानिक कलावंत. त्यात श्रुती जोशी, मानसी अळवणी, माही सुर्वे, आरती धाडी, विराज सोनी, हर्षल सोनवणे हे नवकलावंत आपल्या गाण्याच्या कलेतून जळगावकर रसिकांच्या मनाची स्पंदने टिपतील. या सदाबहार कार्यक्रमाचे आकर्षण असेल नाशिक येथील तरुण सुफी गायक ऋषीकेश शेलार. सोबतीला नाशिकचा "ट्रेंट म्युझिक ग्रुप' आपल्या साथसंगीतानं या कार्यक्रमात रंगत आणेल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon sakal yaungistan program