"खानदेश यिन फेस्टिव्हल'ची उत्सुकता शिगेला 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

जळगाव ः "सकाळ माध्यम समूहा'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) व्यासपीठांतर्गत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी "सकाळ-खानदेश यिन फेस्टिव्हल'चे आयोजन केले आहे. महाविद्यालयीन युवकांसाठी "धम्माल मस्ती करणाऱ्या' या फेस्टिव्हलची उत्सुकता लागली असून, नोंदणीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. 

महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी "सकाळ माध्यम समूहा'तर्फे "यिन'चे एक हक्‍काचे व्यासपीठ उभारले आहे. या व्यासपीठांतर्गत वर्षभर वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. याचाच एक भाग म्हणून युवक-युवतींच्या आग्रहास्तव जळगावात प्रथमच खानदेश यिन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येत आहे. हा फेस्टिव्हल 25 डिसेंबरला जळगावातील मू. जे. महाविद्यालयात रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी खानदेश एज्युकेशन सोसायटी, वूड अँड ब्रिक्‍स कॅफे व वाहेगुरू मोबाईल प्रायोजक आहेत. 

35 हजारांची रोख बक्षिसे 
खानदेश यिन फेस्टिव्हलमध्ये गायन (सोलो), गायन (ड्यूट), सोलो डान्स, ड्यूट डान्स, ग्रुप डान्स होतील. तसेच पोस्टर प्रेझेंटेशन "दुष्काळी परिस्थिती' व "शहरातील वाहतूक व्यवस्था' हे विषय देण्यात आले आहे. अशा विविध प्रकारात प्रथमच जळगावात फेस्टिव्हल घेण्यात येत आहे. यामधील विजेत्या स्पर्धकांना साधारण 35 हजार रुपयांचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह तर सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

सोमवारपर्यंत नोंदणी 
फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी वयाची अट 16 ते 26 अशी असून, युवक-युवतींना यात सहभाग घेता येणार आहे. यासाठीची नावनोंदणी सुरू असून, यास मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता मुदत वाढविण्यात आली असून, नोंदणी सोमवारी (24 डिसेंबर) दुपारी चारपर्यंत होणार आहे. अधिक माहितीसाठी- अंकुश सोनवणे (9689053211), मुनिरा तरवारी (9881154218) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Web Title: marathi news jalgaon sakal YIN festival