जळगावच्या कृणालने साकारला "कच्चेमाठ' 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 एप्रिल 2018

जळगावच्या कृणालने साकारला "कच्चेमाठ' 

जळगावच्या कृणालने साकारला "कच्चेमाठ' 

जळगाव : चित्रपट क्षेत्राची घरात कोणताही पार्श्‍वभूमी नसताना शहरातील कृणाल जाधव याने स्वत: दिग्दर्शन करून "कच्चेमाठ' हा लघुपट तयार केला आहे. पुणे येथे होणाऱ्या फिल्म फेस्टिवलमध्ये तो दाखविला जाणार आहे. 
"कच्चेमाठ' हा लघुपट कुंभाराच्या मुलीच्या जीवनावर आधारित आहे. त्या मुलीला आपले स्वप्न साकार करायचे असते. मात्र तिला असंख्य अडचणी येतात. त्यातूनही ती स्वप्न साकार करते, अशी ही कथा आहे. कथेचे लेखन कृणाल जाधव यानेच केले आहे.जळगावातच हा लघुपट तयार करण्यात आला असून यातील कलावंतही स्थानिकच आहेत. 
कृणाल यांचे वडील नरेंद्र जाधव जळगावातच रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात. कृणालचे शिक्षण सेंट लॉरेन्समध्ये झाले तर महाविद्यालयीन मू. जे. महाविद्यालयात झाले. एम.बी.ए.मार्केटिंग पुणे येथून पूर्ण केले. परंतु त्याला चित्रपट क्षेत्राची आवड असल्याने पुणे येथे फिल्मचे वर्कशॉप पूर्ण केले, त्या ठिकाणी त्याने फिल्म तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्याने अगोदर "नशा' हा लघुपट तयार केला होता. मात्र तो फेस्टिवलला जाऊ शकला नाही. चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम आणि सत्यजित रे त्याचे आदर्श आहेत. त्याने चित्रपट रायटर्स आणि दिग्दर्शक असोसिएशनचे सदस्यपद घेतले आहे. जळगावातही चांगला लघुपट करता येऊ शकतो, असे मतही त्याने व्यक्त केले. "कच्चा माठ' लघुपटाचा सहाय्यक दिग्दर्शक सचिन राऊळ आहे. तर हर्षल हरेश्‍वर, अनिल मोरे, चंद्रकांत चौधरी, संजीवनी व्यवहारे, सरिता तायडे, सागर भडंगर, आकाश शर्मा, राजकुमार शर्मा हे स्थानिक कलावंत आहेत. 
 

Web Title: marathi news jalgaon sakarla