Loksabha 2019 : "सखी' मतदान केंद्रात मतदारांचे होणार स्वागत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

जळगाव ः जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक सखी मतदान केंद्र असेल. हे मतदान केंद्र फुगे, पताका लावून सजविले जाणार असून, मतदारांचे औक्षणही केले जाईल. विशेष म्हणजे, या केंद्रांवर सेल्फी पाइंट देखील असणार आहे. जिल्ह्यात अशी 12 "सखी' मतदान केंद्रे असतील. तेथे सर्व कर्मचारी महिलाच असतील. मतदारांनी अधिकाधिक संख्येने या केंद्रांवर मतदानासाठी यावे, असे नियोजन आहे. 

एरवी मतदान केंद्र म्हटले, की प्रवेशद्वाराजवळच पोलिसांचा पहारा, निवडणूक प्रक्रियेत गुंतलेले अधिकारी व कर्मचारी.. अन मतदान केंद्रात असलेले गंभीर वातावरण. मात्र, यंदा मात्र असे चित्र सखी मतदान केंद्र व आदर्श मतदान केंद्रांवर दिसणार नाही. सखी मतदान केंद्राबाहेर आकर्षक कमान, स्वागताचे फलक असेल. फुगे, पताकांनी केंद्र सजविलेले असेल. मतदान केंद्रात येताच सुवासिनी मराठमोळ्या साडीत मतदारांचे औक्षण करून स्वागत करतील. महिलांना बसण्यासाठी बाक, लहान मुलांना ठेवण्यासाठी पाळणाघराची सोय असेल. दिव्यांग मतदार असतील तर त्यांच्यासाठी व्हिलचेअरची व्यवस्था असेल. पोलिस महिलाच असतील. मतदारांना काही माहिती असेल तर महिलाच ती माहिती देईल. 

सेल्फी पॉइंट 
मतदारांनी मतदान केल्यानंतर मतदान केल्याचा सेल्फी काढण्यासाठी "सेल्फी पॉइंट' असेल. मतदारांना सेल्फीचे आकर्षण असते. यामुळे मतदार अधिकाधिक संख्येने येऊन मतदान करतील. 

सखी मतदान केंद्रांचे नियोजन झाले आहेत. लवकरच ही केंद्रे सज्ज होतील. या केंद्रांवर 23 ला मतदारांचे स्वागत होईल. ही संकल्पना निवडणूक आयोग पहिल्यांदाच राबवीत आहे. 
- गोरक्ष गाडीलकर, निवडणूक निर्णय अधिकारी, 

Web Title: marathi news jalgaon sakhi election center voter swagat