सलमानशीच लग्न करण्याचा शिक्षिकेचा हट्ट 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

जळगाव : एखाद्या सिनेकलावंताचे फॅन असणे, तो आवडणे आणि तरुण वयात क्रेझ असणे ही सामान्य बाब आहे. सुपरस्टार सलमान खानचेही असंख्य चाहते देशभरात आहेत. महाविद्यालयीन तरुणींना आजही त्याच्या दणकट शरीर यष्टीने वेड लावले. त्याची एक झलक बघण्यासाठी तरुणींची झुंबड उडते. मात्र, पस्तीस वर्षीय शिक्षिका असलेल्या अविवाहित तरुणीला केवळ सलमानसोबतच लग्नगाठ बांधायची इच्छा असून आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी आज तिने थेट पोलिस ठाणे गाठून लेखी अर्ज सादर केला. काही असामाजिक तत्त्वे आमच्या लग्नाला अडसर ठरत असून, त्यांचा बंदोबस्त करून भेट घडवून आणण्याची मागणी या तरुणीने केली आहे. 

तोंडाला स्कार्प, अंगात सनकोट घातलेली एक तरुणी आज (23 एप्रिल) दुपारी औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात पोचली. ठाणे अंमलदार संजय भोई, डे-ऑफिसर उपनिरीक्षक नीलेश सोळुंखे ड्यूटीवर होते. दहा ते पंधरा कागदांचा बंच या तरुणीने ठाणे अंमलदाराच्या हातात टेकवला. माझ्या लग्नाला विरोध होतोय, असे म्हटल्यावर ठाणे अंमलदार भोई यांनी, कोण आहे हा तरुण, तुमचे प्रेम प्रकरण वैगेरे आहे का? हा सलमान तांबापुरा भागात राहतो काय. अशा प्रश्‍नासह आंतरधर्मीय प्रेम प्रकरण म्हणून या तरुणीला विचारपूस सुरू होती. शिक्षण एम. ए. बीएड, शिक्षिका आणि लग्नात येणारा अडसर सांगत असलेल्या या तरुणीला गेली दहा मिनिटे ठाणे अंमलदार भोई व उपनिरीक्षक सोळुंखे गांभीर्याने ऐकत होते..अहो ताई...हा सलमान राहतो कुठे..असे म्हटल्यावर मुंबईला राहतो ना, तुम्ही पिक्‍चर-सिनेमा बघता की, नाही मोठा सुपर स्टार झालायं ना तो, कोण..सलमान खान..! असे सांगितल्यावर पोलिस अधिकारी आणि ठाणे अंमलदाराने कपाळावर हात मारून घेतले... ताईऽऽ तुम्ही थंड पाणी प्या..उन्हातून आल्या आहेत शांत व्हा, असे म्हटल्यावरही बया मात्र प्रखरपणे आपले म्हणणे मांडत होती. लेखी अर्ज घ्या अन्‌ आत्ताच कारवाई करा, अशी तिची मागणी होती. पोलिस अधिकारी कर्मचारी अशा दोघांना प्रकार लक्षात येताच त्यांनी या तरुणीकडून लेखी अर्ज घेऊन कारवाई करतो, असे सांगितल्यावर या तरुणीने तोंडाला स्कार्प बांधत पोलिस ठाण्यातून स्कूटी काढली व मार्गस्थ झाली.

Web Title: marathi news jalgaon salman lady teacher