समांतर रस्त्यांच्या कामासाठी प्रतीक्षा कायम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

जळगाव ः जळगाव शहरातील जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा मृत्यूचा सापळा ठरला आहे. आठवड्यातून मोठे अपघात होऊन वाहनधारकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडताहेत. या महामार्गाला समांतर रस्त्याचे काम एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल, असे आश्‍वासन प्रभारी आयुक्त, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले होते. दिलेल्या तारखेला प्रत्यक्षात महिना पूर्ण होत आला तर अद्यापही कामास सुरवात झालेली नाही. 

समांतर रस्ते कृती समितीने 10 जानेवारी 2018 ला मोठा गाजावाजा करीत समांतर रस्ता झालाच पाहिजे, या मागणीसाठी अजिंठा चौफुलीवर रस्तारोको आंदोलन केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी निवेदन कृती समितीला देऊन कामांचा डीपीआर 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होऊन पंधरा एप्रिलपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होईल. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्यक्ष कामास सुरवात होईल, असे सांगण्यात आले. नंतरच्या काळात माजीमंत्री एकनाथ खडसेंनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन समांतर रस्त्यांसह शहरातील महामार्ग विकासासाठी 125 कोटींचा निधी मंजूर करून घेतला, त्यानुसार नवा 139 कोटींचा डीपीआर बनवून "न्हाई'तर्फे तो केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. 
 
काम पुन्हा लांबणार 
एप्रिल महिन्यात प्रस्ताव मंजुरीनंतर निविदा प्रक्रिया होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात प्रस्ताव अद्याप पडून असल्याने निविदा प्रक्रियाही सुरू झालेली नाही. लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचा पाठपुरावाही त्यासाठी कमी पडत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता निविदा झाली तरी पावसाळा सुरू होणार असल्याने चार महिने कामास सुरवात होऊ शकणार नाही. त्यामुळे समांतर रस्त्यांच्या कामासाठी आणखी चार महिने प्रतीक्षा करावी लागेल, असे दिसते. 

Web Title: marathi news jalgaon samanter raod