हरवलेले बालक तीन महिन्यानंतर पालकांच्या कुशीत 

हरवलेले बालक तीन महिन्यानंतर पालकांच्या कुशीत 

जळगाव : नेपाळहून भिवंडीला आपल्या वडिलांच्या भेटीसाठी मामासोबत आलेला तेरा वर्षांचा मुलगा दोन दिवसानंतर आईच्या ओढीने एकटाच परत नेपाळकडे निघाला होता. मात्र, जळगाव स्थानकावर तो चुकला. केशव स्मृती प्रतिष्ठानच्या समतोल प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांच्या दक्षतेमुळे तीन महिन्यांनी त्याच्या आई-वडिलांची भेट होऊन तो आपल्या घरी परतला. 
जळगाव रेल्वेस्थानकावर फिरत असलेला तेरा वर्षीय मुलगा समतोल प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांच्या नजरेस पडला. त्यांनी रेल्वे सुरक्षा बलाकडे नाव नोंदवून त्यास नियमानुसार बालकल्याण समितीसमोर हजर करून बालगृहात दाखल केले. या मुलास भाषा येत नव्हती. भिवंडी येथील वडिलांचा पत्ता सांगता येत नव्हता. फक्त नेपाळमधील निमायल या हिमालयाच्या पायथ्याजवळील गावाचे नाव सांगता येत होते. नेपाळ दुतावास व मुंबई (भिवंडी) भागात त्याचा तपास समतोल प्रकल्पाचे कार्यकर्ते करीत होते. 

असा साधला संपर्क..
विद्यार्थी परिषदेच्या नेपाळ येथील संघटनमंत्र्यांशी प्रतिष्ठानचे सचिव रत्नाकर पाटील यांनी संपर्क साधला. त्यांना ही बाब सांगितली. श्री. काडेल यांनी प्रयत्न करून मुलाच्या गावावरून भिवंडी येथील त्यांच्या वडिलांचा मोबाईल क्रमांक घेऊन प्रकल्प प्रमुखांना कळविले. त्यांना संपर्क केल्यावर मुलाचे वडील, मामा व अन्य दोन नातेवाईक जळगावात प्रकल्प कार्यालयात आले. व्यवस्थापकांनी व कार्यकर्त्यांनी सर्व बाबीची पडताळणी करून त्यांच्यासह बालकल्याण समिती जळगाव समोर हजर होऊन प्रक्रिया पूर्ण करून वाट चुकलेल्या मुलास वडिलांच्या ताब्यात दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com